34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeएज्युकेशनकॉपी कराल तर खबरदार...; बोर्डाच्या परीक्षा केंद्रासाठी कलम 144 लागू!

कॉपी कराल तर खबरदार…; बोर्डाच्या परीक्षा केंद्रासाठी कलम 144 लागू!

दहावी, बारावी परीक्षेदरम्यान मोबाईल आणि अन्य माध्यमांतून होणाऱ्या पेपरफुटीचे सत्र कायमचे थांबविण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कंबर कसून तयारी केली असून परीक्षाकाळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील सर्व झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाने जारी केल्या आहेत. दहावी व बारावी परीक्षा केंद्रांच्या आवारात आणि परिसरात मंगळवारपासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. दि. 21 फेब्रुवारीपासून ते दि. 25 मार्च या कालावधीत ज्या दिवशी परीक्षा होतील, त्याच दिवशी या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. (Section 144 for board examination center!)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी आदर्श कार्यपद्धती नुकतीच जाहीर केली असून परीक्षापूर्व काळात, परीक्षा सुरू असताना आणि परीक्षेची वेळ संपल्यानंतर कोणकोणती कार्यवाही करावी याबाबत शिक्षण मंडळाने सविस्तर परिपत्रक जाहीर केले आहे. प्रत्येक तालुक्यासाठी किमान एक भरारी पथकाची नेमणूक करावी. तसेच परीक्षा केंद्राची संख्या जास्त असल्यास आवश्यकतेनुसार एकापेक्षा अधिक भरारी पथकांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही विभागीय शिक्षण मंडळांना देण्यात आल्या आहेत.

दहावी व बारावी परीक्षा केंद्रांच्या आवारात व परिसरात मंगळवारपासून कलम 144 लागू करण्यात आले आहे. दि. 21 फेब्रुवारीपासून दि. 25 मार्च या कालावधीत ज्या दिवशी पेपर असतील, त्या दिवशी या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या अंमलबजावणीच्या कालावधीत सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत, सी.आर.पी.सी. 1973 मधील कलम 144 अन्वये मोबाईल फोन व त्यासंबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास, वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन व लॅपटॉप यांचा वापर करण्यास सक्त बंदी आहे. कॉपीमुक्त परीक्षा आणि कामकाज सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी भगवान कांबळे यांनी हा आदेश लागू केला आहे.

परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात पोलीस अधिनियम 37 (1)(3) चा वापर करण्यासाठी पोलीस आयुक्त तसेच पोलीस अधीक्षकांची मदत घेतली जाणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. हा बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना व त्यांना नेमून दिलेल्या परीक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणांसाठी लागू राहणार नाही, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

या परीक्षांसाठी कडक बंदोबस्त

दहावीच्या इंग्रजी, गणित आणि विज्ञान तर बारावीच्या इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अर्थशास्त्र, चिटणीसाची कार्यपद्धती, पुस्तपालन व लेखाकर्म, व्यापार संघटन आदी परीक्षांवेळी सर्व परीक्षा केंद्रावर पथके धडक देणार आहेत. त्यासाठी गरज भासल्यास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही मदतही घेतली जाणार आहे. तसेच संवेदनशील परीक्षा केंद्रावर बैठे पथकाची नियुक्ती केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा : CBSE: 10वी-12वी परीक्षेत ChatGPTच्या वापरावर होणार कडक कारवाई!

विद्यार्थ्यांनो सावधान! १०- १२वी परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास होणार कठोर शिक्षा

शिक्षकांचे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी होण्याचे स्वप्न भंगले; शिक्षकांमधूनच पदे भरण्याची मागणी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी देश-विदेशात 7 हजार 250 हून अधिक परीक्षा केंद्रे स्थापन केली आहेत. सीबीएसईने जारी केलेल्या नोटीसनुसार, देशभरातून यावर्षी 38 लाखांहून अधिक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसणार आहेत. त्यापैकी 21 लाख 86 हजार 940 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसणार आहेत, तर 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला बसणार आहेत. 10वीची परीक्षा 16 दिवसांत संपणार आहे. तर बारावीची परीक्षा ३६ दिवस चालणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी