29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयमलिकांच्या अटकेला मुस्लिम जातीचा उल्लेख देण्याचा प्रयत्न, दरेकरांचा गंभीर आरोप

मलिकांच्या अटकेला मुस्लिम जातीचा उल्लेख देण्याचा प्रयत्न, दरेकरांचा गंभीर आरोप

टीम लय भारी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे सध्या ईडीने केलेल्या अटकेमुळे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या या अटकेवर अनेक राजकीय नेत्यांनी आपले मत मांडले आहे. काहींनी त्यांना समर्थन केले तर काहींनी त्यांच्या पदाच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे.(Attempts to mention Muslim caste in Malik’s arrest)

नवाब मलिक यांना अटकेनंतर ३ मार्चपर्यंत ईडी (ED) कोठडी सुनावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांच्यावर सुडाने कारवाई केल्याचा आरोप महाविकास आघाडी करत आहे. आता मात्र यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सोलापूरमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

‘नवाब मलिक हटाव, देश बचाव’ या अभियानाद्वारे हा आरोप खोडून काढू, असे प्रविण दरेकर म्हणाले आहेत. नवाब मलिक यांना भाजपने नाही तर न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सुडाने कारवाई केल्याचा आरोप अर्थहीन आहे, असेही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

दरम्यान, डॉक्टरांचे आंदोलन, एसटी आंदोलन सुरु आहे. त्यांच्याकडे राज्य सरकारचे लक्ष नाही, मात्र अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित लोकांना अटक करण्यासाठी. कोणती ना कोणती कारस्थान समोर आणण्यासाठी सरकारला बरोबर वेळ आहे, अशी टीका देखील प्रविण दरेकरांनी सरकारवर केली आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यातील विमानतळांच्या प्रश्‍नांवर संयुक्त बैठका लवकरच, ज्योतीरादित्य शिंदेचे आश्वासन

खासदार संभाजी राजेचे आझादमैदानात उपोषण सुरू

तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक

KCR Leaves For Delhi Amid Efforts To Unite Non-BJP Parties

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी