28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयअधिवेशनात उपस्थित राहा, एकनाथ शिंदेंनी उद्धव गटातील आमदारांना बजावला व्हिप

अधिवेशनात उपस्थित राहा, एकनाथ शिंदेंनी उद्धव गटातील आमदारांना बजावला व्हिप

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्य-बाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला बहाल केल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने सर्वच्च न्यायालयात व्हीपच्या आधारावर शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होता आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित राहण्याबाबत सर्व ५५ आमदारांना व्हीप बजावला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांचादेखील समावेश असल्यामुळे व्हिपचा मुद्दा अधिवेशनात गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. (Attend the session, Eknath Shinde whips Uddhav group MLAs)

Attend the session, Eknath Shinde whips Uddhav group MLAs

आजपासून सुरु होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित राहण्यासंदर्भात शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनाही व्हीप जरी केला आहे. यावर ठाकरे गटातील आमदार कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून सुरु असलेला कलगीतुरा पाहता हा व्हीप धुडकावण्याचीच अधिक शक्यता असल्याचे उद्धव ठाकरे गटातील आमदारांच्या प्रतिक्रियांवरून लक्षात येत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झालेली नाही. हा निर्णय लागेपर्यंत म्हणजेच दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना न्यायालयानं कारवाईपासून संरक्षण दिलं आहे. त्यामुळे ठाकरे गटातली आमदारांवर पक्षशिस्तीबाबत कारवाई करण्यात येणार नाही हे उघड आहे.

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी टीव्ही ९ शी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ‘टीव्ही ९’शी बोलताना अधिवेशनाला हजर राहणं ही कारवाई होत नसल्याचे म्हंटले आहे. ते म्हणाले, शिवसेनेच्या सर्व आमदारांना आम्ही अधिवेशनात पूर्णवेळ हजर राहण्याचा व्हीप जरी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कारवाई करू नये, असे आदेश दिले आहेत. पण अधिवेशनाला हजर राहणं ही काही कारवाई होत नाही.”

हे सुद्धा वाचा

सुभाषसिंग ठाकूर कोणाचा माणूस आहे याचे उत्तर द्या, महाराष्ट्रद्रोह्यांचे राष्ट्रद्रोह्यांना आव्हान

वरळीतून नाही, तर कोपरी-पाचपाखाडीतून निवडणूक लढवतो ; आदित्य ठाकरेंचे शिंदेंना आव्हान

निम्मे मतदार ठरवणार पुण्यातील 2 नवे आमदार; कसब्यात धंगेकर यांचाच डंका; चिंचवड जगतापांचेच राहणार; पत्रकारांना पाकिटे!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी