35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रठरलं, प्रकाश आंबेडकर 'या' मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार, मविआला अल्टिमेट

ठरलं, प्रकाश आंबेडकर ‘या’ मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार, मविआला अल्टिमेट

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी आपण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? याची घोषणा केली आहेत. मात्र, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत लोकसभेची निवडणूक लढणार की, स्वतंत्र त्या बद्दल संभ्रम कायम आहे. दरम्यान आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली अन् महाविकास आघाडीला निर्वाणीचा इशारा दिला.(Prakash Ambedkar will contest the Lok Sabha elections from Akola)

“मी माझ्या पक्षाच्यावतीने २७ मार्च रोजी अकोला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्याआधी २६ मार्चला आम्ही आमची भूमिका जाहीर करू”, असं प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

मविआ-वंचितच्या आघाडीवर आंबेडकरांचा निर्वाणीचा इशारा

आम्ही चार जागांवर ठाम आहोत.महाविकास आघाडीत काही मतदारसंघात मतभेद दिसून येत आहेत. काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पंरतु ज्या मतभेदाच्या जागा आहेत ते जाहीर केलेले नाहीत. त्याच्यामध्ये काही मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे.

फक्त खुर्चीवर सावरून बसलो म्हणून…CJI चंद्रचूड यांनी ट्रोलर्सना उत्तर देत व्यक्त केली खंत

तर शिवसेनेने त्याबाबत आक्षेप घेतलेला नाही. येत्या एक ते दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. ते चित्र स्पष्ट झालं की ते आमच्यासोबत चर्चा करायला तयार असतील तर आम्ही देखील त्यांच्यासोबत बसायला तयार आहे.

तसेच, आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. त्यांचा तिढा सुटलेला नाही त्यामुळे त्यांच्या याद्या जाहीर होत नाहीयेत. मी त्यांनी दिलेल्या ४ जागांचा प्रस्ताव त्यांना परत करतो, असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

दिल्लीचा कारभार आता तुरुंगातून चालणार; केजरीवालांचा पहिला आदेश जारी

यावेळी बोलताना त्यांनी मी माझ्या पक्षाच्या वतीने २७ मार्चला माझा अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहे, तर २६ मार्चला आम्ही आमची भूमिका जाहीर करू असंही पुढे ते म्हणाले आहेत. मी माझ्या पक्षाच्या वंचितच्या वतीने लढणार असल्याचे आंबेडकर यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी