33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
HomeराजकीयVideo : बाळासाहेब थोरात म्हणाले, देशात एक दिवस कॉंग्रेसचा हात येणार आहे;...

Video : बाळासाहेब थोरात म्हणाले, देशात एक दिवस कॉंग्रेसचा हात येणार आहे; पण…

टीम लय भारी

मुंबई : भारतीय जनता पक्षाने माणसा – माणसांमध्ये, समाजामध्ये बुद्धीभेद केला आहे. काँग्रेसचे नेतृत्व चांगले काम करीत आहे. पण आम्हा कार्यकर्त्यांनाही काम करावे लागले. जनतेसमोर जाऊन सत्य सांगावे लागेल. एक दिवस देशात काँग्रेसचा हात येईल, अशी भावना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केली आहे.थोरात यांनी पत्रकारांशी आज संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, काँग्रेसला खूप मोठी परंपरा आहे. त्यागाची, स्वातंत्र्याची आणि लोकशाहीची परंपरा काँग्रेसला आहे. याशिवाय देशाच्या विकासाची आणि वेळप्रसंगी देशाच्या अखंडतेकरिता बलिदानाची परंपरा आहे. (Balasaheb Thorat Criticized Bjp)

जगामध्ये कॉंग्रेससारखा इतका कोणता पक्ष नसेल की ज्याला इतकी थोर परंपरा नसेल. काळाच्या ओघाने ज्या पद्धतीने माणसांमध्ये बुद्धीभेद केला जात आहे. माणसांमध्ये किंवा समाजात भेद निर्माण केला जात आहे. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत ही वस्तूस्थिती आहे. कॉंग्रेसला काम करावे लागेल.जे कोणी कार्यकर्ते असतील, नेते असतील त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे की, जनतेसमोर जाऊन सत्य सांगण. परंतु, आता जे चाललं आहे ते चुकीच्या पद्धतीने सुरु आहे. देश चुकीच्या दिशेने चालला आहे, हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडत आहोत असं माझं मत आहे.

एक दिवस पुन्हा एकदा देशाच्या हितासाठी हा कॉंग्रेस पक्ष सत्तेत येणार आहे. त्यामुळे आम्हाला काम करावं लागेल. महाविकास आघाडी सरकारचा दोन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या आघाडीला देशपातळीतून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. ‘कितीही काम केले तरी विरोधक हे टीका करतच राहणार. भाजप जितका त्रास देईल, तितकी ‘महाविकास आघाडी’ बळकट होईल, असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना लगावला आहे.

नैसर्गिक संकटातही महाविकास आघाडीने चांगले काम केले

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सुरु आहे. आमच्या सरकारने दोन वर्षापेक्षा जास्त काळ यशस्वीरित्या काम करून दाखविले आहे. खरतर जागतिक स्तरावर आणि देशपातळी याशिवाय राज्यपातळीवर गेले दोन वर्ष सुरु असणारा कोरोनो काळ हा अतिशय धोक्याचा होता.कोरोना, निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते या नैसर्गिक आपत्तीच्या काळात जे काम केले त्या संपूर्ण कार्याचे देशाने कौतुक केले. याशिवाय देशातले सर्वात चांगले सरकार कोणते असा ज्या वेळेस सर्वेक्षण करण्यात आले तेव्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता.

आपण कसंही काम करा मात्र जे विरोधी पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा जबाबदारी आहे, सरकारवर टिका करण्याची. ही जबाबदारी ते चोखपणे पार पाडत आहेत. विरोधकांच्या तपास यंत्रणेमुळे केंद्रातल्या प्रशासनाला बट्टा लागतोय, याची विरोधी पक्ष नेत्यांनी काळजी घ्यायला पाहिजे, असा निशाणा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी साधला.

 

मुख्यमंत्र्यांनी खंबीर भूमिका दाखवून दिली

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विधानसभेतलं भाषण हे उत्कृष्ट होते. जे काही या अधिवेशनामध्ये पहिल्या दिवसापासून गोंधळ सुरु करणं, घोषणा देणं किंवा संपूर्ण जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न सुरु होता त्याला सडेतोड प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्र्याचे भाषण होते.
तपास यंत्रणा कशा असाव्यात त्याने कोणतं काम करावं आणि त्याचा दर्जा कोणता असावा याबाबतीत मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला आणि तो जनतेच्याच भाषेत केला आहे. माझ्या मते आम्ही काय करतोय आणि आम्हाला त्रास कसा होत आहे याशिवाय कशाप्रकारे छळ होत आहे हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले आहे. या सर्व त्रासाला आम्ही खंबीरपणे सामोरे जात असून आमची महाविकास आघाडी ही अत्यंत पक्की आहे. जितके त्रास द्याल तितकी आघाडी पक्की होत जात आहे. आतापर्यंत आम्ही चांगल काम केलं आहे. यापुढेही आम्ही चांगल काम करु, असा विश्वास बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला आहे.

 

 


हे सुद्धा वाचा – 

Balasaheb Thorat : महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी आमदार जयकुमार गोरेंची घेतली फिरकी…

Maharashtra revenue minister Balasaheb Thorat announces stay on NA tax notices to housing societies in Mumbai, Pune

Balasaheb Thorat : भाजपने राजकीय धुळवड थांबवून विकासावर चर्चा करावी, बाळासाहेब थोरातांचा सल्ला

रोहित पवारांनी विधानसभेत मांडलं पोलिसांचं दुखण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी