27 C
Mumbai
Sunday, July 7, 2024
Homeराजकीयनाना पटोले यांच्या पाठोपाठ बाळासाहेब थोरातही फडणवीसांच्या भेटीला

नाना पटोले यांच्या पाठोपाठ बाळासाहेब थोरातही फडणवीसांच्या भेटीला

टीम लय भारी

मुंबई : विधान परिषदेच्या 6 जागांच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळतेय. आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आलीय. प्रज्ञा सातव या बिनविरोध विधान परिषदेवर जाव्यात यासाठी काँग्रेसकडून रणनिती आखण्यास सुरुवात झालीय. त्यासाठीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठोपाठ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे (Balasaheb Thorat met Fadnavis and Patil).

फडणवीस यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की अशी एखादी दु:खद घटना घडली तर त्या पक्षाचा उमेदवार बिनविरोध दिला जातो. याबाबत फडणवीस आणि पाटील यांच्याशी चर्चा केली.

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणतात, मतदारांनी भाजप – आरएसएसला शिकविला धडा

Balasaheb Thorat : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढणार- बाळासाहेब थोरात

त्यांनी सांगितलं की आम्ही वरिष्ठांशी चर्चा करु. दरम्यान, नाना पटोले आणि थोरात यांनी फडणवीसांची वेगळी भेट घेतली. त्याबाबत विचारलं असता, नाना पटोले यांचं विमान होतं. तसंच त्यांच्या घरी शुभकार्य आहे. त्याचं निमंत्रण देण्यासाठी ते फडणवीसांच्या भेटीला आले होते. त्यावेळी त्यांना तुम्हीही विनंती करा असं सांगितल्याचं थोरात म्हणाले.

रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यता आली आहे. काँग्रेसने 15 नोव्हेंबर रोजी याबाबत अधिकृत घोषणा केली  होती. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचं निधन झालं. त्यामुळे रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Balasaheb Thorat : मराठी चित्रपट आणि चित्रपटगृहे पुनर्जीवित करण्याला प्राधान्य : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

maharashtra: GR soon on non-agricultural land conversion, says Balasaheb Thorat

विरोधी पक्षाशी चर्चा करून प्रज्ञा सातव यांना  बिनविरोध निवडून आणण्याचा  प्रयत्न करणार असल्याच नाना पटोले म्हणाले होते. त्या नंतर आता नाना पटेले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध

यापूर्वी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीवेळी काँग्रेस नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर काँग्रेसतर्फे रजनी पटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. याच जागेसाठी निवडणुकीत भाजपने दिलेला उमेदवार मागे घेण्याची विनंती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि पटोले यांनी फडणवीसांकडे केली होती. त्यानंतर भाजप उमेदवारानं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी