33 C
Mumbai
Tuesday, May 28, 2024
Homeराजकीयबाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून मोफत डिजिटल सातबारा घरपोच

बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून मोफत डिजिटल सातबारा घरपोच

टीम लय भारी

संगमनेर : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाला आधुनिकता व गतिमानता दिली आहे. महात्मा गांधींच्या जयंती निमित्ताने राज्यभरात डिजिटल सातबारा घरपोच देण्यास सुरुवात झाली आहे (Balasaheb Thorat to give free digital Satbara on your doorstep).

संगमनेर महसूल विभागाने राजापूर व खांडगाव येथे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांना डिजिटल सातबाऱ्याचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी बोलताना आमदार डॉक्टर तांबे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांची थोर पुरुषांनी भारताच्या उभारणीत अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. महात्मा गांधी हे आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतिदूत आहेत. तर लालबहादूर शास्त्री यांनी पाकिस्तान विरुद्ध चे युद्ध भारताला जिंकून दिले आहे.

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणतात, मतदारांनी भाजप – आरएसएसला शिकविला धडा

Balasaheb Sanap : माजी आ. सानप यांचा भाजपा मध्ये प्रवेश

त्यांच्या विचारातून काम करणे नव्या पिढीने अत्यंत गरजेचे आहे. बाळासाहेब थोरात राज्यात अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. महसूल सारखे अति महत्त्वाचे खाते सांभाळताना या खात्याला त्यांनी लोकाभिमुख केले आहे. पहिल्यांदा सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबवून या खात्याला आधुनिकता दिली. तर आता नव्याने ऑनलाईन पद्धतीने सातबारा डिजिटल करून तो शेतकऱ्यांना घरपोच केला आहे.

यामुळे अनावश्यक नोंदी आपोआप नाहीशा होणार असून शेतकऱ्यांना तातडीने डिजिटल सातबारा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर ई पीक पाहणी, ई-फेरफार या योजनाही त्यांनी राबवल्या आहेत. सरकारमध्ये अत्यंत चांगले काम करताना सर्वसामान्यांच्या विकासासाठी झटणाऱ्या बाळासाहेब थोरात यांनी सहकार, समाजकारण, शिक्षण यातून राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. शेतकऱ्यांनी नवीन आधुनिक प्रणालीचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले.

Balasaheb Thorat : मराठी चित्रपट आणि चित्रपटगृहे पुनर्जीवित करण्याला प्राधान्य : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

Congress, NCP back down on opposing three-member ward system

बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून मोफत डिजिटल सातबारा घरपोच

तर प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाला आधुनिकता व डिजिटलता दिली आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे बिनचुक काम कमी वेळेत होणार आहे. यामुळे हेलपाटे कमी होणार असून शेतकऱ्यांना तात्काळ सातबारे मिळणार आहे. याशिवाय अनावश्यक नोंदही कमी होणार आहे या नव्या योजनेमुळे महसूल विभागाचे कामकाज देशपातळीवर आदर्शवत होणार आहे.

यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगळूरे, तहसीलदार अमोल निकम, जि प सदस्य रामहरी कातोरे , कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ, स्वामी दयानंदगिरी महाराज, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ, नायब तहसीलदार तहसीलदार उमाकांत कडनर,

तालुका विकास  अधिकारी थोरात,सर्कल मोरे मॅडम,उमेश देवधडे,सरपंच शैला हासे, बादशाह हासे, माधवराव हासे भरत गुंजाळ,ग्रामसेवक विशाल काळे साहेब तंटामुक्ती अध्यक्ष दामोधर गुंजाळ , संजय गुंजाळ,शिवाजी वर्पे,लक्ष्मण गुंजाळ , अॅड.विकास गुंजाळ, सखाराम काळे,पांडुरंग गुंजाळ ,दादासाहेब रूपवते,विठ्ठल गुंजाळ व ग्रामस्थ उपस्थित  होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी