30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयठाकरे सरकारचा मोठा निर्णय, डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरीत होणार

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरीत होणार

टीम लय भारी

डोंबिवली :- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि वादाचा विषय ठरलेला धोकादायक रासायनिक कारखाने स्थलांतराचा मुद्दा अखेर संपुष्टात आला आहे. राज्य सरकारने डोंबिवलीतील असे तब्बल १५६ रासायनिक कारखाने दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला आहे.( Big decision Thackeray government, dangerous factories)

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. धोकादायक आणि अतिधोकादायक अशा कारखान्यांचा यात समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

‘पेगॅसस’ च्या मुद्द्यावरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नितेश राणेंचा मोठा निर्णय, न्यायालयासमोर शरण जाणार

गुजरातच्या ‘गिफ्ट सिटी’वर संजय राऊतांचा आक्षेप, म्हणाले ‘आमच्या पैशावर बाजीरावगिरी करु नका’

Budget 2022-23 failed to meet expectations of common people, says Maharashtra CM Uddhav Thackeray

धोकादायक आणि अतिधोकादायक अशा कारखान्यांचा यात समावेश आहे. दरम्यान या निर्णायाच स्वागत डोंबिवली मधील नागरिकांनी केले आहे.

डोंबिवली एमआयडीसीमध्ये एकूण ५२५ औद्योगिक भूखंड आहेत. तर ६१७ निवासी भूखंड आहेत. रासायनिक कारखान्यांमध्ये होणारे संभाव्य अपघात टाळण्याच्या दृष्टीने रहिवासी भागांपासून प्रामुख्याने ५० मीटर अंतरावर असलेले १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरित केले जाणार आहेत.

हा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान कामा संघटनेने याला ठाम विरोध केला आहे.

दरम्यान, डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील सध्याचे धोकादायक कारखाने उत्पादनात बदल करून तिथे व्यापारी, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान संबंधी उत्पादने तयार करण्यास परवानी दिली जाणार आहे. कारखाने स्थलांतरित होत असताना कामगार, पर्यावरण आदींबाबत योग्य निर्णय संबंधित विभाग घेतील, अशी देखील माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी