27 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरराजकीयChitra Wagh : भाजपने चित्रा वाघ यांना दिली मोठी जबाबदारी

Chitra Wagh : भाजपने चित्रा वाघ यांना दिली मोठी जबाबदारी

आपल्या परखड वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या फायरब्रँड महिला नेत्या चित्रा वाघ यांना भारतीय जनता पक्षाकडून ,मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चित्रा वाघ यांची भाजपकडून प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

आपल्या परखड वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या फायरब्रँड महिला नेत्या चित्रा वाघ यांना भारतीय जनता पक्षाकडून ,मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चित्रा वाघ यांची भाजपकडून प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली. पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे बक्षीस म्हणून चित्रा वाघ यांना हे पद देण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या माजी आमदार पंकजा मुंडे यांना डावलून भाजपने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांच्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करायची असो किंवा त्यांना उत्तर द्यायचे असो, चित्रा वाघ या याबाबतीत नेहमीच पुढे असतात. यासोबतच राज्यातील महिलांचे प्रश्न अत्यंत आक्रमकपणे मांडण्यात त्या अग्रेसर आहेत. त्यामुळेच पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वाघ यांना या पदी नियुक्ती झाल्याबद्दल नियुक्तीपत्र देखील देण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे आधीच नाराज आहेत. अनेकवेळा त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. परंतु आता पुन्हा एकदा त्यांना डावलण्यात आल्याने पंकजा मुंडे या नेमक्या याबाबत काय मत व्यक्त करणार हे पाहावे लागणार आहे.

भाजपकडून नवी जबाबदारी दिल्यानंतर चित्रा वाघ यांनी याबद्दलची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. चित्र वाघ म्हणाल्या की, ‘मी या पदाला पूर्ण न्याय देईन. आगामी काळात पूर्ण ताकदीने काम करेन. तुम्ही मला तीन वर्षांत काम करताना पाहिले आहे. माझा राज्य दौरा 7 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.’ पहिल्या दौऱ्याची सुरुवात सिंदखेडराजा येथून होणार असल्याचे त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले. ‘पक्षाने मला संधी दिली. मी तुमच्यापेक्षा वेगळी नाही. आता आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे,’ असेही त्या यावेळी म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी राजकारणात करणार एंट्री

Maharashtra Politics : आपले वाद मिटवा व जनतेचे रखडलेले प्रश्न सोडवा, सत्ताधाऱ्यांकडून सामंजस्याचे पाढे

Job Recruitement : एसबीआयमध्ये निघाली बंपर भरती

यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘उमा खापरे आमदार झाल्यानंतर पक्षाने चित्रा वाघ यांना महिला मोर्चाच्या अध्यक्षा केल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महिलांना पूर्ण न्याय मिळेल.’

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!