29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयभाजपकडून नाशिक साठी शिंदे गटाला नवी ऑफर

भाजपकडून नाशिक साठी शिंदे गटाला नवी ऑफर

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीनंतर माघारीची घोषणा केल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून नाशिकच्या जागेवर उमेदवार घोषित होणे अपेक्षित होते. परंतू अद्यापही घोषणा न झाल्याने महायुतीत नाशिकच्या जागेवरून नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. हा नवा ट्विस्ट शिंदे सेनेला कोंडीत पकडणारा असून शिंदे सेनेला ठाणे लोकसभा मतदारसंघ हवा असेल तर नाशिक भाजपला सोडण्याची ‘गिव्ह ॲण्ड टेक' ऑफर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून  देण्यात आले आहे. लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाचा महायुतीमधील तिढा अद्यापही सुटत नाही. भारतीय जनता पक्षाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये आघाडी दिसून येत असल्याने भाजपकडून प्रथम जागेची मागणी करण्यात आली.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीनंतर माघारीची घोषणा केल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून ( Shinde group) नाशिकच्या जागेवर उमेदवार घोषित होणे अपेक्षित होते. परंतू अद्यापही घोषणा न झाल्याने महायुतीत नाशिकच्या जागेवरून नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. हा नवा ट्विस्ट शिंदे सेनेला कोंडीत पकडणारा असून शिंदे सेनेला ठाणे लोकसभा मतदारसंघ हवा असेल तर नाशिक भाजपला सोडण्याची ‘गिव्ह ॲण्ड टेक’ ऑफर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून  देण्यात आले आहे. लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाचा महायुतीमधील तिढा अद्यापही सुटत नाही. भारतीय जनता पक्षाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये आघाडी दिसून येत असल्याने भाजपकडून प्रथम जागेची मागणी करण्यात आली.(BJP offers fresh offer to Shinde group for Nashik polls)

सन १९८५ वगळता भाजपचा खासदार एकदाही निवडून न आल्याने ही जागा भाजपलाच मिळावी अशी इच्छा व्यक्त झाली.परंतु शिवसेनेच्या शिंदे गटानेही दहा वर्षांपासून खासदार असल्याने जागेचा आग्रह धरला. शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्यानंतर महायुतीत खटके उडाले. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी खा. शिंदे यांच्या वक्तव्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली. महायुतीकडून अद्याप जागा वाटप झाले नसताना खासदार शिंदे यांनी केलेली घोषणा भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसनेही नाराजी व्यक्त केली. अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार असल्याने नाशिकच्या जागेवर दावा ठोकला.

राज ठाकरे व अमित शहा भेटीच्या पार्श्वभूमीवर मनसेनेही उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतू भाजप व मनसेने एक-एक पाऊल मागे घेतले. शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मात्र रस्सीखेच सुरू राहिली. शिंदे गटाकडून ठोस असा दावा केला जात असतानाच अचानक माधव पॅटर्न समोर आला. भाजपकडून नाशिकची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडताना छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाली. भुजबळ यांचे नाव समोर आल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघाचे वातावरण ढवळले. महायुतीत काही ठिकाणी विरोध तर काही ठिकाणी तगडे समर्थन मिळाले. जनमानसाचा कानोसा नकारात्मक असल्याची बाबदेखील समोर आली.

त्यानंतरही महायुतीकडून नाशिक लोकसभेसाठी नाव जाहीर होत नसल्याने अखेरीस तीन दिवसांपूर्वी भुजबळ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेच्या शिंदे गटालाच जाणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले गेले. त्याच अनुषंगाने हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरू केली. भुजबळ यांनी माघारीची घोषणा केल्यानंतर शिंदे गटाकडून जागेची व उमेदवारीची घोषणा तत्काळ होणे अपेक्षित होते. मात्र तीन दिवसानंतरही गोडसे यांच्या नावाची घोषणा झाली नाही. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवीन ट्विस्ट निर्माण झाल्याची चर्चा समोर येत आहे.

ठाणे द्या, नाशिक घ्या!

भुजबळ यांच्या माघारीनंतर शिंदे गटात जागेसाठी रस्सीखेच सुरु झाली. विद्यमान खासदार गोडसे यांच्याबरोबरच उबाठा गटाचे लोकसभा संघटक विजय करंजकर यांचेदेखील नाव शिंदे गटाकडून चर्चेत आले. दोघांपैकी एक अशी चर्चा सुरु असतानाच नवा ट्विष्ठ निर्माण झाला. त्यात नाशिकची जागा शिंदे गटाच्या हातून जात असल्याचे दिसून येत आहे. ठाणे लोकसभा मतदार संघाबरोबरच नाशिकच्या जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाने दावा केला.

मात्र भाजपला देखील ठाण्याची जागा हवी आहे. भाजपने एक पाऊल मागे घेत शिंदे गटासमोर ‘गिव्ह अँड टेक’ ऑफर दिली. शिंदे गटाला ठाणे लोकसभेची जागा हवी असेल तर भाजपला नाशिकची जागा द्यावी किंवा नाशिकची जागा हवी असेल तर ठाण्याची जागा भाजपला द्यावी, अशी ऑफर ठेवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे निर्माण झालेला नवा ट्विस्ट पुन्हा एकदा नाशिकच्या जागेचा वाद टोकाला निर्माण करणारा ठरत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी