35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयभाजपला धक्का; तिकीट जाहीर झालेल्या उमेदवारांची माघार

भाजपला धक्का; तिकीट जाहीर झालेल्या उमेदवारांची माघार

महाराष्ट्रात काही ठिकाणी उमेदवार बदलासाठी दबाव असताना आज गुजरातमध्ये भाजपला (BJP) धक्का देणारी घटना घडली. गुजरातमध्ये तिकीट जाहीर झालेल्या उमेदवारांनी माघार घेत निवडणुक न लढण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात नेमकं चाललयं तरी काय? असं सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत. (BJP Two Gujarat candidates returned tickets Loksabha Election 2024)

महाराष्ट्रात काही ठिकाणी उमेदवार बदलासाठी दबाव असताना आज गुजरातमध्ये भाजपला (BJP) धक्का देणारी घटना घडली. गुजरातमध्ये तिकीट जाहीर झालेल्या उमेदवारांनी माघार घेत निवडणुक न लढण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात नेमकं चाललयं तरी काय? असं सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत. (BJP Two Gujarat candidates returned tickets Loksabha Election 2024)

लोकसभेच बिगुल वाजल्यानंतर प्रत्येक पक्षात तिकिटांसाठी चढओढ पाहायला मिळत आहे. अनेकजण तिकीट मिळण्यासाठी फिल्डिंग लावून बसले आहेत. तर गुजरातमध्ये भलताच प्रकार पाहायला मिळाला. गुजरात मध्ये बडोदा आणि साबरकांठा या दोन मतदारसंघात भाजपचं तिकीट जाहीर झालेल्या उमेदवारांनी माघार घेतली आहे.

नेमकं प्रकरण काय?

बडोद्याच्या खासदार रंजन भट्ट आणि साबरकांठाहून भीकाजी ठाकुर यांनी खासदारकीचे तिकीट परत केले आहे. भट्ट यांनी खासगी कारणांमुळे निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा केली आहे. भाजपाने त्यांना सलग तिसऱ्यांदा तिकीट दिले होते. तर भीकाजी यांच्या जातीवरून वाद सुरु आहे. यामुळे त्यांनी निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

अनुराग कश्यप म्हणतोय, ‘मला भेटायचं असेल तर 15 मिनिटांसाठी एक लाख द्या’

रंजन भट्ट यांनी ट्विट करत तिकीट परत देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी वैयक्तिक कारण दिलं आहे. पण रंजनबेन यांच्या उमेदवारीवरून काही दिवसांपूर्वी पोस्टर वॉर सुरू झाले होते. यातील काही पोस्टर्सवर, ‘मोदी तेरे से बैर नहीं, रंजन तेरी खैर नहीं।, असं लिहिलं होतं.

गुजरातमधील लोकसभेच्या 26 जागांपैकी भाजपने 22 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये रंजनबेन यांच्यासह चार महिलांच्या नावांचा समावेश आहे. रंजनबेन यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर आता केवळ 3 महिला उमेदवार उरल्या आहेत.

तर भिकाजी ठाकुर यांचा वाद काय?

भिखाजी ठाकोर हे अरवली जिल्ह्यातील भाजपचे जिल्हा सरचिटणीस आहेत. भिखाजी आधी आपले आडनाव दामोर असं लिहितात. नंतर 2023 मध्ये त्यांनी आपल्या आडनावात बदल केला अन् ठाकुर असं लावले.

राज ठाकरे आले तर महायुतीची कशी उणीव भरून निघेल

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने साबरकांठा लोकसभा जागेसाठी भिखाजी ठाकोर यांच्या नावाची घोषणा केल्यापासून ठाकोर आणि डामोर या आडनावांवरून वाद सुरू होता. अनेकांनी हँडबिल छापून ते व्हायरल केल्यामुळे ते वादात सापडले. भिखाजी ठाकोर बक्षीपंचमधून आले होते, तरीही भाजपचे अनेक लोक त्यांच्या आडनावाचा छुपा विरोध करत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी