29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeराजकीयBreaking News : 55 वर्षे राजकारणात सक्रिय असणारा नेता हरपला! सपाचे संस्थापक...

Breaking News : 55 वर्षे राजकारणात सक्रिय असणारा नेता हरपला! सपाचे संस्थापक मुलायम सिंग यांचे निधन

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी (10 ऑक्टोबर) गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात निधन झाले. 1 ऑक्टोबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी (10 ऑक्टोबर) गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात निधन झाले. 1 ऑक्टोबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मुलायम सिंह यांच्या निधनानंतर समाजवादी परिवारात शोककळा पसरली आहे. त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच मुलगा अखिलेश यादव, भाऊ शिवपाल यादव आणि सून अपर्णा यादव दिल्लीला रवाना झाले होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी साधना गुप्ता यांचेही निधन झाले. मुलायम सिंह यादव यांच्या निधनाची माहिती देताना सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, “माझे आदरणीय वडील आणि सर्वांचे नेते आपल्यात राहिले नाहीत.”

पत्नी साधना गुप्ता यांचे जुलैमध्ये निधन झाले
यापूर्वी मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे या वर्षी जुलैमध्ये निधन झाले होते. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे गुरुग्राम येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. साधना या मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांची पहिली पत्नी मालती देवी यांचे 2003 मध्ये निधन झाले.

हे सुद्धा वाचा

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांच्या कॉलेजची कौतुकास्पद कामगिरी

Flipkart Wrong Delivery : ‘सगळा नशिबाचाच खेळ!’ एका ग्राहकाने मागवला आयफोन 13 मिळाला आयफोन 14, वाचा सविस्तर

IAS Officer News: सनदी अधिकाऱ्याचा मनाचा मोठेपणा, परदेशात खेळायला जाणाऱ्या तरूणीला एका दिवसात दिला पासपोर्ट!

1939 मध्ये जन्म
55 वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले मुलायम सिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई येथे झाला. त्यांनी राज्यशास्त्रात एमए केले. 1967 मध्ये यूपीमधील जसवंत नगरमधून आमदार निवडून आल्यानंतर ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही. ते आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि सात वेळा निवडून येऊन लोकसभेचे खासदार झाले. 1996 मध्ये त्यांना संयुक्त आघाडी सरकारमध्ये संरक्षण मंत्री होण्याची संधीही मिळाली.

मोठा राजकीय प्रवास
मुलायमसिंग यादव यांची राजकीय कारकीर्द अतिशय गौरवशाली आहे. 1977 मध्ये ते जनता पक्षाकडून पहिल्यांदा यूपीचे मंत्री झाले, तर 1989 मध्ये ते पहिल्यांदा यूपीचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 1993 आणि त्यानंतर 2003 मध्ये त्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवले. मुलायम सिंह यांनी 1992 मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली आणि 1993 मध्ये बसपासोबत सरकार स्थापन केले. त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांची समाजवादी पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पक्षाच्या संरक्षकाची जबाबदारी पार पाडत होते. मुलायमसिंह यादव सध्या लोकसभेत मैनपुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी