33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयसहकुटुंबासोबत बावनकुळे; फोटो शेअर करत दिली माहिती

सहकुटुंबासोबत बावनकुळे; फोटो शेअर करत दिली माहिती

राज्यात आता निवडणुकांपूर्वीच सर्वच पक्ष आपापल्या मतांपोटी सत्ताधारी विरोधी पक्षावर तर विरोधक सत्ताधारी पक्षावर टीका करत आहेत. याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrahekhar Bawankule) हे प्रचारासाठी राज्यात वेगवेगळ्या सभा घेत आहेत. आगामी निवडणुकांचा विचार केल्यास भाजपने आतापासून तयारी करायला सुरूवात केली आहे. अशा स्थितीत आता चंद्रशेखर बावनकुळे आपल्या परिवारासह मकाऊला कौटुंबिक सहल घेऊन फिरायला गेले आहेत. यावेळी बावनकुळे हे मकाऊ येते कॅसिनो खेळत असल्याचा फोटो शिवसेना खासदार संजय राऊतांनी आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे. यावर संजय राऊतांनी (sanjay raut) भाजप आणि बावनकुळेंना चांगलंच झापलं आहे. (BJP)

काय आहे नेमकं प्रकरण

चंद्रशेखर बावनकुळे आपल्या परिवारासह कौटुंबिक सहल घेऊन मकाऊला गेले आहेत. यावेळी मकाऊमध्ये ते कॅसिनो खेळत असतानाचा त्यांचा एक फोटो व्हायरल होऊ लागला आहे. यावर संजय राऊतांनी जुगारी असा उल्लेख केला होता आणि ट्विट करत हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? अशी टीका देखील राऊतांनी केली आहे. या बदल्यात भाजपने आदित्य ठाकरेंचा फोटो शेअर करत कोणती व्हीस्की पीत आहेत? अशी टीका केली आहे. संजय राऊतांनी केलेल्या टीकेला बावनकुळेंनी खरी खोटी सुनावली आहे.


काय म्हणाले बावनकुळे?

बावनकुळे आपल्या कुटुंबासह मकाऊ येथे वेळ घालवण्यासाठी आले आहेत. कॅसिनो खेळत असतानाच्या फोटोबाबत बावनकुळेंनी खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी कॅसिनो आणि हॉटेलचा परिसर एकच असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत. ‘मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे’; असे ट्विट करत बावनकुळेंनी खुलासा केला आहे. यावर भाजप नेते प्रविण दरेकरांनी ट्विट करत संजय राऊतांवर हल्ला केला आहे.

प्रविण दरेकरांचे ट्वीट

‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होते. तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आहे आणि त्याच्याच शेजारी हा कॅसिनो आहे. या परिसरात बावनकुळेजी कुटुंबासह होते. त्यावेळी कुणीतरी काढलेला हा फोटो आहे. केवळ बदनामी करण्याच्या हेतूने हा फोटो घेतलेला आहे. त्यांच्या शेजारी त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील बसले होते. मात्र जाणीवपूर्वक फक्त एकट्या बावनकुळे साहेबांचा फोटो टाकला’; असे ट्विट करत दरेकरांनी संताप व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी