27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयसंजय राऊत आणि बावनकुळेंच्या 'त्या' फोटोवरून ट्विट वाॅर

संजय राऊत आणि बावनकुळेंच्या ‘त्या’ फोटोवरून ट्विट वाॅर

राज्यात निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी यांच्यात वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. एका बाजूला आरक्षणावरून राजकारण सुरू असल्याचं सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. वर्ल्डकप क्रिकेटचा अंतिम सामना हा अहमदाबाद स्टेडियमवर ठेवण्यात आला होता. यावरून क्रिकेट खेळाविषयी  राजकरण सुरू असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता बावनकुळेंच्या (Chandrashekhar bawankule) कॅसिनो खेळताना (Casino) एका फोटोवरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर टीकेचे असूड सोडलो आहेत. शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊतांनी (sanjay raut) बावनकुळेंचा कॅसिनोतील फोटोबाबत ट्विट करून जुगारी असा उल्लेख करत बावनकुळेंवर टीका केली आहे. तर दुसरीकडे भाजपने बावनकुळेंची पाठराखण करत आदित्य ठाकरेंचा फोटो ट्विट करत टीका केली आहे.

सोशल मीडियावरती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कॅसिनो जुगार खेळत आहेत. यावर त्यांनी ट्विट करत लिहीलं की, ‘१९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ व्हेनेशाईन. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है!’ असे ट्विट संजय राऊतांनी केले आहे.

हे ही वाचा

‘नरेंद्र मोदी स्टेडियम ‘पनवती’; भारतीय क्रिकेट रसिकांच्या चर्चा तर काही नेते मंडळींचे मत

‘समस्या सोडवता येत नसतील तर सत्तेतून बाहेर पडा’; वडेट्टीवारांचा भुजबळांवर रोष

घड्याळ कुणाचं? शरद पवार सुनावणीसाठी दिल्लीला रवाना होणार

भाजपचे प्रत्युत्तर

भाजपनेही प्रत्युत्तर म्हणून आदित्य ठाकरे मद्य प्राशन करत असल्याचा फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. यावरून संजय राऊत आणि भाजप हमरातुमरीवर येऊ लागले आहेत. यावर भाजपने संजय राऊतांना प्रत्युत्तर म्हणून ट्विट करत फटकारले आहे. ‘आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ आदित्य ठाकरेंच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की? असे ट्विट भाजपने केले आहे. यावर आता संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊतांचे भाजपला प्रत्युत्तर

‘ते म्हणे, फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत. जाऊ द्या, त्यांच्यासोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे.. कधीच जुगार खेळले नाहीत.. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय?!’; असे म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि बावनकुळेंना फटकारले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी