35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयआघाडीत बिघाडी; ठाकरे गटाने उमेदवार जाहीर करताच काँग्रेसमधून नाराजीचा सूर

आघाडीत बिघाडी; ठाकरे गटाने उमेदवार जाहीर करताच काँग्रेसमधून नाराजीचा सूर

आज ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये ठाकरे गटाने (Uddhav thackeray) सांगलीवरही आपला हक्क गाजवला. पण उद्धव ठाकरेंच्या या निर्णयामुळं आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरेंनी यावर पुनर्विचार करावा असा सल्ला दिला आहे. (congress leaders upset uddhav thackeray announced candidate in sangli)

आज ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये ठाकरे गटाने (Uddhav thackeray) सांगलीवरही आपला हक्क गाजवला. पण उद्धव ठाकरेंच्या या निर्णयामुळं आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरेंनी यावर पुनर्विचार करावा असा सल्ला दिला आहे. (congress leaders upset uddhav thackeray announced candidate in sangli)

सांगलीच्या जागेवर काँग्रेसने दावा केला होता. त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये या जागेवरून रस्सीखेच सुरू होती. तसेच या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात धुसफूस वाढली होती. यासंदर्भात दोघांमध्ये चर्चादेखील सुरु होती. दरम्यान, ठाकरे गटाने पहिली यादी जाहिर करत सांगलीच्या जागेवर आपला उमेदवार जाहीर केला.

ठाकरे गटाने सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना संधी दिली आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाने ठाकरे गटावार नाराजी व्यक्त केली आहे.

डाव फिस्कटला; वंचितांनी घेतली जरांगेंची साथ; जैन-मुस्लिम- ओबीसी समाजाला दिली उमेदवारी

आघाडी धर्म पाळला असता तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. तसेच चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित केल्याने आघाडी धर्माला गालबोट लागले. यावर त्यांनी पुनर्विचार करावा, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

वडेट्टीवर यांच्यासोबत बाळासाहेब थोरात यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईची जागेवर शिवसेनेनं उमेदवार जाहीर केला, हे योग्य नाही. या जागांवर चर्चा सुरू असताना उमेदवार जाहीर केले. आघाडी धर्म हा सगळ्यांनी पाळला पाहिजे. आमचा आजही आग्रह तोच आहे. जो निर्णय ठाकरे गटाने जाहीर केला आहे त्या जागांवर पुनर्विचार केला पाहिजे. असं थोरात यावेळी म्हणाले.

ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; बड्या नेत्यांना दिली संधी

तसेच वर्षा गायकवाड यांनीदेखील ट्विट करत ठाकरे गटावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘आताच्या घडीला एवढेच सांगेन की, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सांगली लोकसभा आणि मुंबईतल्या ज्या लोकसभेच्या जागा, जिथे मित्रपक्षांमध्ये एकमत होणे अजून बाकी आहे, तिथे एकतर्फी उमेदवार जाहीर नको करायला हवे होते. मुंबईचा मुद्दा जिथे आहे, यासंदर्भात आम्ही आमची नाराजी आमच्या पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवली आहे आणि त्यांच्या आदेशानुसार पुढची पावलं उचलण्यात येतील. असा इशाराही वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

सांगिलच्या उमेदवारीवर संजय राऊत काय म्हणाले?

महाविकास आघाडीत कोणत्याही जागेचा तिढा नाही. शिवसेनेने आज उमेदवारांची घोषणा केली, त्या अर्थी आमच्यात कोठेही कोणताही तिढा नाही. रामटेकदेखील आमची जागा होती. पण त्या जागेवर काँग्रेस पक्षाने उमेदवार जाहीर केला आहे. त्यामध्ये आम्ही कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे कोणताही तिढा नाही आणि नव्हता”, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी