38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयदिल्लीत महिला कॉंग्रेसचे महागाई विरोधात जोरदार आंदोलन, केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी

दिल्लीत महिला कॉंग्रेसचे महागाई विरोधात जोरदार आंदोलन, केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी

टीम लय भारी

मुंबई : सध्या सातत्याने पेट्रोल-डिझेल तसेच अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ होत आहे. महागाई आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींवरून काँग्रेस (Congress) आज देशभरात निदर्शने करत आहे.या महागाईच्या विरोधात दिल्लीमध्ये महिला कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे.यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंच्या सततच्या वाढत्या महागाईसाठी काँग्रेसने सरकारविरोधात आंदोलनाचे बिगुल वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी शनिवारी ‘महागाईमुक्त भारत अभियान’ जाहीर केले आहे. त्याअंतर्गत हे आंदोलन सुरु झाले आहे.

हे आंदोलन 31 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान देशभरात तीन टप्प्यात केले जाणार आहे. यावेळेस अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि प्रदेश अध्यक्ष, संध्या सव्वालाखे, वैशाली संजय जाधव,प्रदेश सचिव उज्वल साळवे, महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी धनश्री महाडिक सातारा जिल्हा माजी जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते. (Congress protests against inflation in Delhi)

यासोबतच देशातील महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत महिला काँग्रेसकडून आंदोलनेही करण्यात येत आहेत. 31 रोजी जंतर-मंतरवर प्रचंड निदर्शने करण्यात आली. त्यासाठी संपूर्ण मध्यप्रदेशात महिला काँग्रेसची तयारी सुरू आहे. या निदर्शनात विधानसभा स्तरावरून महिलांचा एक गट दिल्लीत पोहोचून आंदोलनाला व्यापक स्वरूप देणार आहे. (Congress protests against inflation in Delhi)

सर्वसामान्यांना या महागाईचा फटका

देशात महागाई वाढली आहे. सर्वसामान्यांना या महागाईचा फटका बसत आहे. काँग्रेस एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महागाई विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेस नेते आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे. काँग्रेस हे आंदोलन मार्च महिन्याच्या 31 तारखेपासून करणार आहे. हे आंदोलन सात दिवस चालणार असल्याची माहिती  नाना पटोले यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा – 

महागाईविरोधात काँग्रेसचा निषेध

सत्यजित तांबे यांचा पुढाकार, युवक कॉंग्रेसने केले वृक्षारोपण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी