29 C
Mumbai
Sunday, July 7, 2024
Homeमुंबई‘शरद पवारांमुळे काल काँग्रेसने शिवसेनेला पत्र दिले नाही'

‘शरद पवारांमुळे काल काँग्रेसने शिवसेनेला पत्र दिले नाही’

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी काल काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याच्या पत्रांची आवश्यकता होती. पण शरद पवारांनी चर्चेसाठी आणखी एक दिवस पुढे ढकलला. त्यामुळे अंतिम निर्णय होऊ शकला नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी ही माहिती ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीशी बोलताना दिली.

सोनिया गांधी यांनी काल सायंकाळी शरद पवार यांना फोन केला होता. त्यावेळी पवार यांनी चर्चा करण्यासाठी आणखी एक दिवस पुढे ढकलण्याबाबत सोनिया गांधी यांना सुचविले. राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक अगोदर होऊद्या. त्यानंतर गरज पडली तरच दिल्लीतील नेत्यांना महाराष्ट्रात बोलावता येईल, असेही पवार यांनी सोनिया गांधींना सुचविले होते. त्यामुळे आता पवार यांच्याशी चर्चा करूनच सत्ता स्थापनेचा पुढील निर्णय होईल, असे ठाकरे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसची आज दुपारी बैठक आहे. या बैठकीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होईल. गरज पडली तर शिवसेनेच्या नेत्यांनाही बोलाविले जाईल, असेही ठाकरे म्हणाले.

काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तिन्ही पक्षाचे एकमत झाले तरच सत्ता स्थापन होऊ शकते. त्या दृष्टीने किमान समान कार्यक्रम तयार करणे गरजेचे आहे. या दृष्टीने काँग्रेसने काल वेगवान बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर सोनिया गांधी यांनी पवार यांच्याशी संपर्क साधला होता, असे ते म्हणाले.

पवार यांनी सुचविल्यानुसार आता आज पुढील चर्चा होईल. या चर्चेत तिन्ही पक्षांमध्ये एकमत होऊ शकते याचे संकेतही ठाकरे यांनी दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी