29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयदिल्लीचा कारभार आता तुरुंगातून चालणार; केजरीवालांचा पहिला आदेश जारी

दिल्लीचा कारभार आता तुरुंगातून चालणार; केजरीवालांचा पहिला आदेश जारी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक केल्यानंतर दिल्लीचे सरकार कोण चालवणार असा प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी पहिला आदेश जारी करत दिल्लावासीयांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या या आदेशामुळं दिल्लीचा कारभार तुरुंगातून चालणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. (Delhi CM Arvind Kejriwal sends order from ED custody to Water Minister Atishi)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक केल्यानंतर दिल्लीचे सरकार कोण चालवणार असा प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी पहिला आदेश जारी करत दिल्लावासीयांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या या आदेशामुळं दिल्लीचा कारभार तुरुंगातून चालणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. (Delhi CM Arvind Kejriwal sends order from ED custody to Water Minister Atishi)

दिल्लीतील कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगचा आरोप ठेऊन ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली. केजरीवाल यांना आता 28 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या या अटकेनंतर दिल्लीला वाली कोण? त्यांची जागा कोण घेणार? दिल्लीचा कारभाराचा गाडा आता हाकणार? की, त्यांच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र त्यांची पत्नी सुनिता हाती घेणार? असे अनेक सवाल उपस्थित होत होते.

रवींद्र धंगेकरांनी घेतली शरद पवारांची भेट; नेमकी काय झाली चर्चा?

पण, कायद्यानुसार, मुख्यमंत्र्यांना अटक केली असता त्यांना तुरुंगातून सरकार चालवण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत, तसा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे केजरीवाल यांनी तुरुंगातून कारभार चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

तुरुंगातून दिला पहिला आदेश

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून दिलेल्या आदेशासंदर्भात दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

घड्याळ चिन्ह वापरण्याची आम्हाला परवानगी, अजित पवारांच्या NCPचे पहिले निवेदन प्रसिद्ध

“दिल्ली सरकारच्या जल मंत्रालयाशी संबंधित पहिला आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला. दिल्लीत काही ठिकाणी पाण्याच्या समस्या असून त्या ठिकाणी पाण्याचे टँकर वाढवण्यासंदर्भात केजरीवाल यांनी सूचना दिल्या आहेत.”

काय म्हणाल्या आतिशी?

“अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांसाठी जल मंत्रालयाशी संबंधित तुरुंगातून आदेश दिले आहेत. हे पाहून माझ्या डोळ्यातही पाणी आले. अशा परिस्थितीत कोण असा विचार करतं? तुरुंगात राहूनही ते दिल्लीच्या लोकांचा विचार करत आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या कामांचा विचार करत आहेत. पण मी तुम्हाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावतीने सांगते, दिल्ली सरकारच्या कामाजावर त्यांचे बारीक लक्ष आहे. ते लोकांची काळजी घेत आहेत.

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; कोल्हापुरात शाहू महाराजांना ‘वंचित’चा पाठिंबा

एवढंच नाही तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सर्व विभागांमध्ये सुरू असलेल्या कामांचा आणि विकासाचा आढावा घेत आहेत. आता उन्हाळा असल्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या आहेत. त्यामुळे त्या समस्या कशा सोडवायच्या, याबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील”, असे मंत्री आतिशी यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी