31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभा लढवण्यासाठी संजय राठोडांवर दबाव; CM शिंदेंची घेतली भेट

लोकसभा लढवण्यासाठी संजय राठोडांवर दबाव; CM शिंदेंची घेतली भेट

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. अशातच वाशीम-यवतमाळ भावना गवळींच्या (Bhavana Gawali) या मतदारसंघात इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु आहे. त्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशातच राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चादेखील सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. अशातच वाशीम-यवतमाळ भावना गवळींच्या (Bhavana Gawali) या मतदारसंघात इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु आहे. त्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशातच राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चादेखील सुरु आहे. 

वाशीम-यवतमाळ मतदार संघात लोकसभेसाठी भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्याऐवजी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे. यांना उमेदवारी दिली तर महायुतीला अधिक फायदा होईल अशी माहिती सर्वत्र पसरताच राठोड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी भेटीमध्ये त्यांनी नाराजी व्यक्त करत मला राज्यातच ठेवा अशी विनंती केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंनी डिवचले, राहूल गांधींच्या सभेपूर्वी बाळासाहेबांची काढली आठवण !

काही दिवसांपूर्वी, यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाचेही नाव न घेता महायुतीचा उमेदवार राहील, असे भाकीत केल्याने उमेदवारीचा पेच अद्याप कायम आहे. गेल्या २५ वर्षांपासून यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार भावना गवळी यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का? की पालकमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे येणार की अन्य दुसराच उमेदवार राहील यावरून उलट सुलट चर्चा रंगत आहेत.

जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali)आणि राज्याचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod)  यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत. त्यांच्यातील राजकीय संघर्षाने अनेकदा टोक गाठलं. भावना गवळी सलग 25 वर्षापासून लोकसभेच्या खासदार, तर संजय राठोड सलग 20 वर्षांपासून विधानसभेचे आमदार. शिवसेना हेच दोघांचे राजकीय पक्ष आहे.

‘काँग्रेसमुळे देश अखंड राहिला…’, संजय राऊतांनी केलं काँग्रेसचं तोंडभरून कौतुक

यवतमाळ आणि वाशिम पश्चिम विदर्भातले दोन महत्त्वाचे जिल्हे. शेतकरी आत्महत्यांसाठी हे दोन्ही जिल्हे नेहमीच चर्चेत असतात. तेवढीच चर्चा होते इथल्या खासदार भावना गवळी आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या राजकीय स्पर्धेची.

एकाच पक्षात बरेच वर्ष राजकारण करत असताना दोन दिग्गज नेत्यांमध्ये राजकीय स्पर्धा असतेच, मात्र भावना गवळी आणि संजय राठोड यांच्या मधली ती राजकीय स्पर्धा त्या पलीकडची आहे. गेली कित्येक वर्ष दोघे क्वचितच एका मंचावर येतात. दोन्ही जिल्ह्यात दोघांचे संघटनात्मक कामे स्वतंत्रपणे चालतात. दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही फारशी एकी दिसून येत नाही. त्यामुळे गेले कित्येक वर्षे शिवसेना यवतमाळ आणि वाशीम या दोन जिल्ह्यात दोन नेत्यांमध्ये विभागली गेली आहे.

देशात सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. तर महाराष्ट्रात (maharashtra lok sabha) पाच टप्यात मतदान होणार आहे. राज्यात गेल्या अडीच वर्षात राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. आधी महाविकास आघाडी सत्तेतं आलं आणि त्यानंतर शिवसेना (ShivSena) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) उभी फूट पडली. त्यानंतर आता महायुती सरकार स्थापन झालं आहे. आता राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी