33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रनिलेश लंकेंच्या उमेदवारीबाबत जयंत पाटलांचे मोठं वक्तव्य

निलेश लंकेंच्या उमेदवारीबाबत जयंत पाटलांचे मोठं वक्तव्य

लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha election) पार्श्वभूमीवर राज्यात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या गटातील आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) लवकरच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत गेल्या काही दिवसांपासून संभ्रम निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी लंके यांनी शरद पवारांसोबत पत्रकार परिषद घेतली. मात्र त्यांचा अधिकृत प्रवेश अद्याप झालेला नाही. दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यासंदर्भात  मोठं वक्तव्य केलं आहे.  लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha election) पार्श्वभूमीवर राज्यात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या गटातील आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) लवकरच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत गेल्या काही दिवसांपासून संभ्रम निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी लंके यांनी शरद पवारांसोबत पत्रकार परिषद घेतली. मात्र त्यांचा अधिकृत प्रवेश अद्याप झालेला नाही.  

नुकतंच जयंत पाटील यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर वर भाष्य केलं. तसेच, निलेश लंके यांच्याबद्दल मोठा विश्वास व्यक्त केला.

काय म्हणाले जयंत पाटील?

निलेश लंके हे अहमदनगरमधील लोकप्रिय नेते आहेत. ते तिथून लोकसभेसाठी उभे राहिले तर १०० टक्के निवडून येतील. त्यांच्याबाबत आम्ही या मताचे आहोत की, लंके आमचे उमेदवार व्हावेत. त्याबाबतीत आवश्यक ते सोपस्कार आम्ही योग्य वेळी पूर्ण करू. मी निलेश लंके यांना तुतारी भेट दिली होती. ती तुतारी त्यांनी घेतली. परंतु, मी असं कोणतंही वक्तव्य करणार नाही, ज्यामुळे निलेश लंके अडचणीत येतील.

निलेश लंके यांनी तुतारी स्वीकारली की नाही याबाबत मी सध्या भाष्य करणार नाही. कारण असं केल्याने लंके अडचणीत येऊ शकतात आणि मला त्यांना अडचणीत आणायचं नाही. परंतु, मी एक गोष्ट ठामपणे सांगेन की आम्ही अहमदनगर लोकसभा मतदारसंघात तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही. अहमदनगर लोकसभा जिंकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

मुंबई महापालिकेची सूत्रे हाती घेतलेले भूषण गगराणी आहेत तरी कोण?

निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार गटात जात असावेत, असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील दिले होते. त्याप्रमाणे निलेश लंके यांनी गेल्या आठवड्यात पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयात जाऊन शरद पवार आणि त्यांच्या गटातील नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक लढवण्याबाबत किंवा शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत लंके आणि शरद पवार या दोघांनीही मौन बाळगलं. परंतु, लंके शरद पवार गटात जातील अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी