26 C
Mumbai
Monday, July 8, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडणवीसांनी शिवतीर्थावर राज ठाकरेंची घेतली भेट

देवेंद्र फडणवीसांनी शिवतीर्थावर राज ठाकरेंची घेतली भेट

टीम लय भारी

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली आहे. राज ठाकरे आणि फडणवीस यांचा गॅलरीतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे(Devendra Fadnavis: Raj Thackeray’s visit on Shiv Tirtha)

अचानक या दोन नेत्यांमध्ये भेट झाली असल्यामुळे युतीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. परंतु ही भेट कौटुंबीक असल्याचेही सांगितले जात आहे. राज ठाकरे कृष्णकुंजच्या बाजूलाच असलेल्या शिवतीर्थ या घरात वास्तव्यास आहेत.

केजरीवालांचा पंजाब जिंकण्यासाठी नवा फंडा; रिक्षावाल्याच्या घरी जेवण अन् ऑटो राईड

भाजपला गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का?: नाना पटोले

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बऱ्याच वर्षानंतर निवासस्थानी भेट झाली आहे. आगामी निवडणुकांपुर्वीच राज ठाकरे यांची फडणवीसांनी भेट घेतली असल्यामुळे चांगल्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. फडणवीस अचानक राज ठाकरेंच्या नव्या घरी दाखल झाले.

या भेटीमध्ये राज-फडणवीस यांच्यात चांगल्याच गप्पा गोष्टी झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान घराच्या गॅलरीमध्ये दोन्हे नेते आले होते त्यावेळीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हास्यविनोद करत असल्याचे दिसत आहे. तसेच फडणवीसांच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे नुकसान होणार !

Devendra Fadnavis visits Raj Thackeray at his new house, meeting triggers speculation ahead of BMC polls

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता शिवतीर्थ या नव्या घरात वास्तव्यास आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या नव्या घरी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. फडणवीस नव्या घरी भेट देणारे तिसरे व्यक्ती आहेत. यापुर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची सपत्नीक भेट घेतली होती.

तर काही दिवसांपुर्वी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने राज ठाकरेंच्या घरी जाऊन भेट घेतली होती. संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली होती यानंतर आता फडणवीस यांनी राज ठाकरे यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

चंद्रकांत पाटील यांच्यानंतर फडणवीस-राज ठाकरे भेट

आगामी निवडणुकीमध्ये भाजप-मनसे युती होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली होती. राज ठाकरे यांनी परप्रांतीयांची भूमिका सोडली तर युतीबाबत विचार करु असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होते.

त्यामुळे भाजप-युतीचे संकेत पाटील यांनी दिले होते. राज ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमध्ये युतीबाबत चर्चा झाली नसल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी