21.6 C
Mumbai
Friday, January 27, 2023
घरराजकीयबोम्मई यांच्या ट्विटबाबत अमित शहांना पत्र लिहिणार फडणवीस

बोम्मई यांच्या ट्विटबाबत अमित शहांना पत्र लिहिणार फडणवीस

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. बोम्मई (B.S. Bommai) यांच्या महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या व चिथावणी देणाऱ्या ट्वीट्सबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना पत्र लिहणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत केली.

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सीमाप्रश्नासंदर्भात झालेल्या महाराष्ट्राच्या अवमाननेचा व राज्य सरकारच्या निष्क्रियतेचा मुद्दा लावून धरला होता. बुधवारी विधीमंडळातील कामकाजादरम्यान चव्हाण यांनी या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, सीमा प्रश्नासंदर्भात महाराष्ट्राची बदनामी करणारे ते ट्वीट बोम्मई यांच्या व्हेरिफाईड हॅंडलवरून झाले आहेत. त्या ट्वीटर हॅंडलला ब्ल्यु टिक आहे. अजूनही ते ट्वीट डिलिट झालेले नाहीत. तरीही महाराष्ट्राचे सरकार त्यांनी पाठीशी का घालते? ते हॅंडल फेक असल्याचे सांगून आपण त्यांची पाठराखण का करतो? कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर आरोप करीत असताना राज्य सरकार शांत का आहे? असे अनेक प्रश्न चव्हाण यांनी यावेळी विधानसभेत उपस्थित केले.

हे सुद्धा वाचा
ओमिक्रॉन बीएफ 7 : चीनमध्ये कहर माजवणाऱ्या कोरोना व्हेरीएंटचे भारतात चार रुग्ण; जुलैतच गुजरातमध्ये आढळले होते पहिले प्रकरण; सरकारला जाग आली निवडणुका आटोपल्यांनतरच!! 

मेंढपाळांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई करा; अंबादास दानवे यांची मागणी

टीईटी घोटाळ्यात मंत्री, अधिकाऱ्यांच्या मुलांची नावे असल्याने कारवाईला उशीर; अजित पवार यांचा आरोप

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या ताणला गेला असून विरोधीपक्षांनी राज्य सरकारला हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावरुन घेरले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये असे म्हटले होते. तसेच महाराष्ट्रातील काही गावांवर देखील हक्क सांगितला होता. त्यावर कुरघोड्या करत सीमाभागातील गावांना कर्नाटकचे पाणी देखील सोडले होते. दोन दिवसांपूर्वी कर्नाटक पोलीसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची अडवणूक केली होती. त्यापूर्वी सीमाभागात महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले देखील केले होते. नुकताच १७ तारखेला महाविकास आघाडीने मुंबईत शिंदे-फडणवीस सरकारविरोधात काढलेल्या मोर्च्यात कर्नाटकचा मुद्दा देखील होता.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!