27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयधनगर आरक्षणाच्या मोर्च्याहून परतताना धनगर बांधवांचा मृत्यू

धनगर आरक्षणाच्या मोर्च्याहून परतताना धनगर बांधवांचा मृत्यू

राज्यात काही महिन्यांपासून मराठा बांधवांनी मराठा आरक्षणाच्या मागणीस सुरुवात केली आहे. अशातच आता ओबीसी आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक दिवसांपासून धनगर बांधव आंदोलन आणि मोर्चे काढत आहेत. आरक्षणासाठी काही महिन्यांपूर्वी धनगर समाजातील काही आंदोलकांनी आत्महत्या केली होती. दरम्यान आता नागपूरहून येताना धनगर बांधवांचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावून घ्यावे अशी धनगर समाजाची मागणी आहे. यामुळे धनगर समाजाने हिवाळी अधिवेशनावर आंदोलन केलं. मात्र मोर्च्याहून परतताना काही आंदोलकांचा अपघात झाल्याने धनगर समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मोर्चा संपवून निघालेल्या मोर्चेकऱ्यांच्या गाडीला झालेल्या अपघातात दोघांना जबर मार लागला असून हे दोन मोर्चेकरी परभणी जिल्ह्यातील आहेत. मात्र इतर तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. सरफराजपूर येथून येत असताना मोर्चेकऱ्यांच्या गाडीला वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मण पंडितराव वाघमारे आणि रमेश दत्ताराव वाघमारे असे मयत झालेल्या मोर्चेकऱ्यांचं नाव आहे.

सविस्तर माहिती

सविस्तर माहितीनुसार परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील सरफराजपुर गावातील अनेक धनगर बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी नागपूरच्या धनगर मोर्च्यासाठी आले होते. मोर्चा झाल्यानंतर मोर्चेकरी आपापल्या गावाकडे निघू लागले होते. यावेळी रात्री तीन वाजेच्या सुमारास मोर्चेकऱ्यांच्या गाडीला पाठिमागून अज्ञात वाहनांनी धडक दिली होती. यावेळी मोर्चेकरी गंभीर जखमी झाले रंगराव  वाघमारे, राम बनसोडे आणि बापूराव वाघमारे असे जखमी झालेल्या मोर्चेकरांची नावे आहेत.

तर लक्ष्मण वाघमारे आणि रमेश वाघमारे यांचे निधन झालं आहे, याबाबत भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी माहिती देत ट्विटद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी