मराठी चित्रपटसृष्टीतील लक्षिकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. रवींद्र बेर्डेंनी लक्ष्मीकांत बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांच्यासोबत अनेक चित्रपटांमधून काम केलं होतं. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना घशाचा कर्करोग होता. त्यांच्यावर मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. रुग्णालयातून दोन दिवसांआधी घरी आणले असता, त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्या झटक्याने त्यांचे निधन झाले. रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि सूना तसेच नातवंडं असा त्यांचा परिवार आहे.
रवींद्र बेर्डे यांना पहिला हृदयविकाराचा झटका हा १९९५ साली व्यक्ती वल्ली नाटकादरम्यान आला होता. त्यानंतर २०११ पासून त्यांना कर्करोग आजाराने ग्रासले होते. आजारपणातही त्यांनी नाटक सोडले नाही. त्यांनी आपले काम सुरू ठेवले. मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम करत नावलौकिक मिळवला.
मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून अतीव दुःख झाले. आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या रवींद्र बेर्डे यांच्या निधनाने मराठी नाट्य व चित्रपट क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले आहे.… pic.twitter.com/C7BU1ZBhVB
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 13, 2023
हे ही वाचा
धनगर आरक्षणाच्या मोर्च्याहून परतताना धनगर बांधवांचा मृत्यू
‘निवडणुकांपूर्वी सरकार जुन्या पेन्शनवर निर्णय घेणार’
मुंबईत अतिरिक्त टोल वसूली सुरूच; खर्च १ हजार कोटी, वसूली ३ हजार कोटींपर्यंत होणार
रवींद्र बेर्डे यांचे चर्चेत आलेले काही चित्रपट
१९६५ पासून त्यांची नाटकांशी नाळ जोडली गेली होती. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटात काम करायला सुरुवात केली. थरथराट, हमाल दे धमाल, भुतांची शाळा, चंगू मंगू, एक गडी अनाडी, खतरनाक यांसारख्या चित्रपटांमधून लक्षात राहील असं काम केलं आहे. त्यांनी इतर ३०० मराठी चित्रपटांप्रमाणे हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
‘या’ दिग्गज अभिनेत्यांसोबत केलं काम
आपले सख्खे भाऊ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह काम केलं आहे. त्यासोबत त्यांनी इतरही अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. अशोक सराफ, महेश कोठारे, विजय चव्हाण, विजू खोटे, भरत जाधव आणि सुधीर जोशी यांच्यासोबत काम केलं आहे. मधल्या काही काळात ते मनोरंजन क्षेत्रापासून दूर होते. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.