32 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeराजकीय'निवडणुकांपूर्वी सरकार जुन्या पेन्शनवर निर्णय घेणार'

‘निवडणुकांपूर्वी सरकार जुन्या पेन्शनवर निर्णय घेणार’

जुन्या पेन्शनबाबत सरकारी कर्मचारी आंदोलन करत असून जुन्या पेन्शनचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या नागपुरमध्ये हिवाळी अधिवेशन असल्याने हा मद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून अनेक दिवसांपासून रखडलेल्या जुन्या पेन्शनबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधान केले आहे. जुनी पेन्शन कधी सुरू होईल यासाठी किती कालावधी लागू शकतो याबाबतची माहिती आता अजित पवारांनी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी यावर निर्णय होणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. सुबोधकुमार, के. पी. बक्षी आणि सुधीर श्रीवास्तव या तिघांची समिती स्थापन केल्यानंतर आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

लोकसभेची चिंता करू नका हे मजबूत आणि बहुमताचं सरकार आहे. आगामी निवडणुकीपूर्वीच यावर निवड होईल. असा विश्वास त्यांनी दिला असून अधिवेशनादरम्यान त्यांनी सागितलं असल्याने हा मुद्दा चर्चेत आला. लोकसभेनंतर सहा महिन्यांनी आपली निवडणूक आहे. निवडणुका लागायच्या आधी जुन्या पेन्शनच्या मुद्द्याबाबतीत हे सरकार निर्णय घेईल, असे अजित पवार म्हणाले आहेत.

समितीनं आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. त्याचबरोबर देशातील ज्या राज्यात जुन्या पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यात आला आहे, त्याची माहितीही मागविण्यात आली आहे. ती माहिती आल्यानंतर त्याबाबतचा अभ्यास करण्यात येईल. जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक असून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मी देतो, अशी माहिती अजित पवारांनी ट्विट करत दिली.

हे ही वाचा

मुंबईत अतिरिक्त टोल वसूली सुरूच; खर्च १ हजार कोटी, वसूली ३ हजार कोटींपर्यंत होणार

काश्मीर प्रश्नाला उशीर का झाला? अमित शहांचा कॉंग्रेसला सवाल

‘भाजपा वाजपेयींची राहिली नाही’

जुन्या पेन्शन आंदोलनाबाबत उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंचा पाठिंबा

नागपुर येथे यशवंत स्टेडियमवर सरकारी कर्मचारी,नोकरदार, शिक्षक जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी या आंदोलनासाठी पाठिंबा दिला आहे. यावेळीस हजारो संख्येने सरकारी कर्मचारी, शिक्षकवर्ग आंदोलन करत होते. यावर उद्धव ठाकरेंनी ट्विट करत पेन्शन जन क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्री नाहीये, माझा पक्ष चोरलेला आहे, निवडणूक चिन्ह चोरलेलं आहे. मी मुख्यमंत्री असतो तर आज मी निर्णय घेऊ शकलो असतो. पण आज काही नसताना तुम्हाला ताकद आणि विश्वास द्यायला आलेलो आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे जुन्या पेन्शनसाठी आंदोलनात सहभागी होते.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी