35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeराजकीयSonia Gandhi : सोन‍िया गांधींचे 30 तारखेपर्यंत मौन

Sonia Gandhi : सोन‍िया गांधींचे 30 तारखेपर्यंत मौन

ते सोनिया गांधीची (Sonia Gandhi) भेट घेणार आहे. मात्र 10 जनपथ दिल्ली येथील निवास स्थानी सोन‍िया गांधी 30 सप्टेंबरपर्यंत भेटणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा तिढा अजून सुटलेला नाही. मात्र अशोक गेहलोत या स्पर्धेमधून बाहेर जाऊ शकतात. कारण आता या शर्यतीमध्ये दिग्विजय सिंह यांचे नाव पुढे आले आहे. ते ‘भारत जोडो यात्रा’ सोडून दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे. ते अध्यक्षपदाचा अर्ज भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विधानसभा उपाध्यक्ष डॉ. सीपी जोशी तसेच मंत्री धरीवाल आणि अनेक जणांची बैठक झाली. यामध्ये अशोक गेहलोत राजीनामा देत नसल्याचे मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी सांगितले. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आज दिल्लीला जाणार आहेत. ते सोनिया गांधीची (Sonia Gandhi) भेट घेणार आहे. मात्र 10 जनपथ दिल्ली येथील निवास स्थानी सोन‍िया गांधी 30 सप्टेंबरपर्यंत भेटणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे आज गेहलोत यांच्या बरोबर चर्चा होण्याची शक्यता कमीच आहे. काँग्रेस या संकटातून लवकरच बाहेर पडेल अशी अशा केसी वेणुगोपाल यांनी व्यक्त केली आहे. दोन दिवसांत या प्रश्नावर चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकशाहीच्या मार्गानेच यावा तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी यावेळी पक्षातील नेत्यांना द‍िला. मुख्यमंत्री पदासाठी दावा करणारे सचिन पायलट दिल्लीमध्ये शड्डू ठोकून बसले आहेत. ते सोनिया गांधीच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. परंतु त्या दोन द‍िवस कोणालाही भेटणार नसून, कोणत्याच विषयावर बोलणार नसल्याचे समजते. त्यामुळे त्यांची धाकधूक वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

Mahesh Babu : सुपरस्टार महेश बाबूच्या आईचे निधन

The song : आभाळभर गाणी गाणाऱ्या गान ‘कोकीळे’ला मिळाली एका चौकात जागा

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी केले अमित शहा यांच्या निर्णयाचे स्वागत

तर भरतपुरमध्ये राजस्थानचे पर्यटनमंत्री विश्वेंद्र सिंह यांनी गेहलोत आपला कार्यकाळा पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी 30 सप्टेंबरपर्यंत नामांकन करता येणार आहे. निवडणूकीसाठी केवळ शशि थरुर आणि पवन कुमार बंसल यांचे अर्ज पोहोचले आहेत. सच‍िन पायलट हे दिल्लीमध्ये आहेत. मात्र ते कोणत्याही विषयावर प्रतिक्रीया देत नाही. त्यांनी मौन पाळले आहे. काल 20 आमदारांची अशोक गेहेलोत यांच्या घरी बैठक झाली होती. त्यावेळी या नेत्यांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी