31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादी काँग्रेसचा दावा; शिवसेनेतील ‘हा’ नेता भाजपमध्ये जाणार

राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा; शिवसेनेतील ‘हा’ नेता भाजपमध्ये जाणार

टीम लय भारी

मुंबई :- आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चांची झुंज पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गंभीर आरोप करण्यात आला आहे. आमदार चिमणराव पाटील यांचा एक पाय सध्या शिवसेनेत व एक पाय भाजपमध्ये असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सतिश पाटील यांनी केला (Former NCP MLA Satish Patil claimed to be in BJP). 

सतिश पाटील जळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे काम राष्ट्रवादीला आक्षेपार्ह वाटत नसताना त्यांच्याच पक्षाचे आमदार चिमणराव पाटील यांना ते का आक्षेपार्ह वाटते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

31 जुलै 2021 पर्यंत एमपीएसीच्या सर्व रिक्त जागा भरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

यंदाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार…

यानंतर सतिश पाटील यांनी चिमणराव पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. 2014 च्या विधानसभेत आपला पराभव घडवून आणण्यात आला, असे चिमणराव पाटील म्हणतात. त्याचे खंडन करणे गरजेचे असून वृद्धापकाळामुळे चिमणरावांचे मानसिक संतुलनही अधिकच बिघडले आहे. राष्ट्रवादीत कार्यकर्ते मोठे करण्याची मानसिकता आहे. परंतु शिवसेनेत वेगळे चित्र दिसतेय. जिल्हा परिषदेतील सदस्य डॉ. हर्षल माने यांची शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर तुमची झोप का उडाली?, असा सवाल सतिश पाटील यांनी चिमणराव पाटलांना विचारला (The question was asked by Satish Patil to Chimanrao Patil).

राज्यात महाविकास आघाडी असल्याने शासकीय समित्या नियुक्तीत तिन्ही पक्षांना स्थान द्यावे असे आदेश आहेत. परंतु, आमदार चिमणराव पाटील एरंडोल, पारोळा मतदार संघात हा नियम पाळत नाहीत. त्यांच्यामुळेच आपण काम करण्यास हतबल झालोय, अशी व्यथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्याकडे व्यक्त केली होती, असेही सतिश पाटील यांनी सांगितले (Satish Patil also said that Gulabrao Patil had expressed it to him).

दारे खिडक्या असता बंद, पाठविले ऐसे गतीमंद; मिटकरींनी काढला पडळकरांना चिमटा

Sanjay Raut likens Shiv Sena-BJP re .. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/84134327.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

जळगाव येथील पत्रकार परिषदेत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा बँक संचालक संजय पवार, महिला शहराध्यक्षा मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ आदी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी