33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्र31 जुलै 2021 पर्यंत एमपीएसीच्या सर्व रिक्त जागा भरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

31 जुलै 2021 पर्यंत एमपीएसीच्या सर्व रिक्त जागा भरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

टीम लय भारी

मुंबई :- एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत गाजला. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वप्निलच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली (Ajit Pawar announced to fill all the vacant posts of MPSC by 31st July 2021).

एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेले कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

यंदाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार…

चुकीला माफी नाही, राजन विचारेंनी शिवसैनिकाला लगावला फटका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी एमपीएससी परीक्षेच्या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात उत्तर दिले. अजित पवार म्हणाले, “सभागृहाचा पहिला दिवस असतानाच विरोधी पक्षनेत्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण स्वप्निल लोणकर या उमेदवाराच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. ही बाब वेदनादायी आहे. अशी घटना कुणाच्याही बाबतीत घडू नये, अशी सरकारची भूमिका आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात चर्चा केली,” असे अजित पवार म्हणाले (In the meeting the Chief Minister discussed the matter with all his colleagues said Ajit Pawar).

“मला विरोधकांसह राज्यातील जनतेला सांगायचे आहे की, स्वप्निल लोणकर याने २०१९ मध्ये राज्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिली होती. मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०१९ रोजी झाली. परीक्षेचा निकाल २८ जुलै २०२० रोजी लागला. या परीक्षेत ३,६७१ उमेदवार पात्र ठरले. १२,०० पदांसाठी ही परीक्षा झाली होती. दरम्यान, एससीबीसी प्रवर्गासंदर्भातील निर्णयाला ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे सर्व प्रक्रिया थांबवावी लागली. त्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांच्या मुलाखती होऊ शकल्या नाहीत. याच दरम्यान, कोविडची साथ आली. यात एमपीएससी आयोगाला स्वायत्तता दिलेली असल्याने आयोगाने परीक्षा रद्द केल्या. मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. आयोगाच्या अध्यक्षांशी संपर्क केला. स्वायत्तता दिलेली असली, तरी अशा प्रकारचा निर्णय घेणे योग्य नाही, असे मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांना सांगितले,” असे अजित पवार सभागृहात बोलताना म्हणाले आहेत (The Chief Minister told the President said Ajit Pawar while speaking in the House).

आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, भाजपामधून बाहेर पडा, संभाजी ब्रिगेडचे प्रत्युत्तर

MSCB scam: Democracy will cease to exist if ED investigates all opposition parties, says Ajit Pawar

याच मुद्द्यावर उत्तर देताना पवार म्हणाले, “याच काळात तरुण-तरुणींनी आंदोलने केली, ती उभ्या महाराष्ट्राने बघितली. मला याचा त्याचा संदर्भात जोडायचा नाही. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवडून न आल्यामुळे पद सोडावे लागले. निवडणूक आयोगाने सांगितले की, आम्ही निवडणूक लावली तर न्यायालय त्यासंदर्भात कडक भूमिका घेतो. जिल्हा परिषदेची निवडणूक न्यायालयाने सांगितली म्हणून घेतली. स्वप्निल असे करायला नको होते, अशी सगळ्यांचीच भावना आहे. पण, तो नाउमेद झाला असेल, त्याचा भ्रमनिरास झाला असेल. पण, काल झालेल्या बैठकीत रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. या विषयावर सर्वांनीच भूमिका मांडली. सरकारने ही गोष्ट गांभिर्याने घेतलेली आहे. आज सभागृहात सांगू इच्छितो की, सरकार ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या संपूर्ण रिक्त जागा भरेल. यात कोणताही अडथळा येणार नाही,” अशी घोषणा अजित पवार यांनी केली (Ajit Pawar announced that there will be no obstacle in this).

Ajit Pawar announced vacant posts of MPSC by 31st July 2021
उपमुख्यमंत्री अजित पवार

भरतीसाठी मुख्यमंत्री ठाकरे आग्रही

“आयोगाला स्वायतत्ता दिलेली असली, तरी रिक्त जागा भरत असताना आयोगाच्या अध्यक्षांना बोलावून त्यांच्यासोबत मुलांच्या मनात निर्माण झालेली भावना दूर करण्यासाठी चर्चा केली जाईल. त्यासंदर्भात आजच सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर बैठक घ्यायला मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. यामध्ये राज्य सरकारप्रमाणे तिन्ही श्रेणीतील भरतींना परवानगी दिलीये. त्यासंदर्भात एमपीएससीने लवकर निर्णय घेणे गरजेचे. आहे. पण, या सगळ्यात राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेईल. मला राज्यातील तरुण-तरुणींना सांगायचे आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही सगळी भरती तातडीने करण्याच्या संदर्भात आग्रही आहे. पण, सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश दिलेले असल्याने त्यातून मार्ग काढण्याची भूमिका राज्य सरकारची आहे. स्वप्निलच्या कुटुंबियांना मदत देण्यासंदर्भात भूमिका घेईल. लोणकर कुटुंबियांच्या दुःखात सरकार आणि विरोधक सहभागी आहोत. पुन्हा अशी घटना घडणार नाही, अशी ग्वाही मी देतो,” असे अजित पवार म्हणाले (I testify that such an incident will not happen again said Ajit Pawar).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी