30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीय"कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी...,गोपीचंद पडळकर

“कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी…,गोपीचंद पडळकर

टीम लय भारी
मुंबई:- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. (Gopichand Padalkar ,something that our fame does  disappear)

परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते.

हे सुद्धा वाचा

हर्बल तंबाखूने नवाब मलिक यांच्या डोक्यातील नसा डॅमेज केल्याचे दिसत आहे ,भाजप नेत्याची टिका

परमबीरसिंग यांचा ईडीकडे धक्कादायक दावा, वाझेला पुन्हा कामावर घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव-आदित्य यांचे निर्देश

पिंपरी-चिंचवडमध्ये परिसीमन योजनेत भाजप राष्ट्रवादी आमने सामने

“Hypocrite”: BJP Leader Slams Priyanka Gandhi After Husband Denied Ticket

या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत.

विरोधी पक्षांकडून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव करण्यात येत आहे. यालाच उत्तर देत गोपीचंद पडळकर यांनी एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये ते म्हणाले आहेत की,’कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा…’, असे पडळकर म्हणाले आहेत. तसेच या ट्विटसह त्यांनी नितेश राणेंचा एक फोटो देखील शेअर केला आहे.

दरम्यानच्च न्यायालयात जामीनासाठी केलेला अर्ज नितेश राणेंनी मागे घेतला. तसंच दिवाणी न्यायालयात शरण गेले. तिथे सरकारी वकिलांकडून नितेश राणे यांच्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी