27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयठाकरे सरकारवर तोफ डागत गोपीचंद पडळकरांनी दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा !

ठाकरे सरकारवर तोफ डागत गोपीचंद पडळकरांनी दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा !

टीम लय भारी

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दसर्याचेही निमित्त करून आज मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे. त्यातूनच त्यांनी शिवसेनेला वाघाचे शेपूट म्हणत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ( gopichand padalkar wishesh uddhav thackeray and sanjay raut )

महाराष्ट्र सोन्याचा आहे असे म्हणत त्यांनी शेतकरी, पूरग्रस्त आणि एसटी कर्मचाऱ्यांसोबतच स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याच्याही आत्महत्येचे खापर सरकारवर फोडले आहे.

राज ठाकरेंसाठी आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंना विनंती

जेजुरी गडावर १७ ऑक्टोबरला होणार ओबीसींचा दसरा मेळावा

 महाराष्ट्रात एकच वाघ होते.. ते म्हणजे आमचे हिंदुंचे हिंदुह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे. तुमच्या सारख्या हुजऱ्यांना वाघाच्या शेपटाचीही उपमा देता येणार नाही. कारण  तुम्ही तुमचे शेपूटही……जयहिंद जय मल्हार.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, असे ते यावेळी म्हणाले.

सामान्यांचे प्रश्न सोडवायच्या वेळी महाविकास आघाडीच्या तिन्ही तिघाडींमध्ये बिघाड होतो परंतु बदल्या करावयाच्या झाल्यास मात्र तिन्ही पक्ष एकत्र असतात असा खरमरीत आरोप त्यांनी यावेळी केला.

यानंतर त्यांनी आपला मोर्चा शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे वळवला. ते म्हणाले बकरी उबही देते आणि दूधही देते मात्र तुमची दिवाळी आणि तुमचा दसरा रोजच असतो.

पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला;…. मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही याचं दु:ख नाही!

‘मोदींनी सहकार क्षेत्रातील कीड साफ करायचं ठरवलंय हेच यांचं दु:ख आहे’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी