31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयराज ठाकरेंसाठी आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंना विनंती

राज ठाकरेंसाठी आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंना विनंती

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती महामंडळ आणि मराठी भाषा विभागातर्फे “प्रबोधन मधील प्रबोधनकार” या ग्रंथ प्रकल्पाची निर्मिती झाली आहे. त्याच्या उदघाटन सोहळ्याच्या वेळी राज ठाकरेंनाही आमंत्रण देण्याची विनंती भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना केली आहे. (Ashish Shelar’s request to Uddhav Thackeray for Raj Thackeray)

या साठी त्यांनी खास पात्र लिहून राज ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यातील प्रेमाचे वर्णन केले आहे.

जेजुरी गडावर १७ ऑक्टोबरला होणार ओबीसींचा दसरा मेळावा

उद्धव ठाकरेंकडून पोलिसांना दसऱ्याची भेट, ४५ हजार जणांची होणार पदोन्नती

या पत्रात ते असे म्हणाले, अशा व्यासपीठावर आपल्या सोबत तेही असतील तर एक संस्मरणीय सोहळा महाराष्ट्राला पाहता येईल. तसेच या कार्यक्रमात प्रबोधनकारांचे पणतू राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांसह कुटुंबातील सदस्यांचाही यथोचित सन्मान व्हावा.

त्यांनी आमंत्रण स्विकारावे की नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल. पण ज्या ज्या वेळी त्यांना भेटलो त्या त्या वेळी त्यांच्या तोंडून प्रबोधनकारांचे जाज्वल्य विचार ऐकले आहेत. त्यावर त्यांचे असलेले नितांत प्रेम, आदर आणि व्यासंग मी अनुभवला आहे, असेही ते पुढे म्हणाले.

नव्या पिढीसमोर प्रबोधनकारांचे विचार आणणे ते पोहचवणे ही काळाजी गरजच असून शासनाने हाती घेतलेल्या या उपक्रमातून महाराष्ट्राचा अनमोल ठेवा वाचकांना खुला होणार आहे याबद्दल मनस्वी आनंदच झाला. या ग्रंथाचे प्रकाशन आणि स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक संकेतस्थळाचे लोकार्पण दि. 16 ऑक्टोबरला होत असल्याचे आज शासनाने जाहीर केले आहे. प्रथेप्रमाणे या कार्यक्रमात विरोधीपक्षनेत्यांही आमंत्रित केले असते तर अधिकच आनंद झाला असता, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

वरुण गांधींनी अटल बिहारी वाजपेयींचा जुना व्हिडीओ केला ट्वीट, म्हणाले…!

Ashish Shelar alleges sub-standard material used in Mumbai’s coastal road

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी