31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयराज्यपालांचा दिलदारपणा : व्लादिमीर पुतिन ज्या खुर्चीमध्ये बसले होते, त्याच खुर्चीत सफाईगार,...

राज्यपालांचा दिलदारपणा : व्लादिमीर पुतिन ज्या खुर्चीमध्ये बसले होते, त्याच खुर्चीत सफाईगार, धुणीभांडी करणाऱ्या महिलांना दिला शाही भोजनाचा मान  

 

टीम लय भारी

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ‘महाविकास आघाडी सरकार’ यांच्यात सतत शितयुद्धाच्या चकमकी झडत असतात. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्याविषयी जनतेच्या मनात संमिश्र भावना आहेत.भगतसिंह कोश्यारी यांच्या राजकीय भूमिकेविषयी काहीही वाद असतील. परंतु माणूस म्हणून ते फार मोठ्या मनाचे आहेत. गोरगरीब व सामान्य लोकांप्रती ते फार मुलायम वागतात.

नुकताच, ८ मार्च रोजी महिला दिन साजरा झाला. या महिला दिनानिमित्त त्यांनी ऐतिहासिक पायंडा पाडला. आजवर कोणत्याही राज्यपालांनी जे केले नाही, ते त्यांनी करून दाखविले.जागतिक दर्जाच्या अतिथींसोबत ज्या सभागृहात राज्यपाल भोजन घेतात, त्या ठिकाणी त्यांनी राजभवनवर काम करणाऱ्या सर्व महिलांना शाही भोजनाचा मान दिला.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासारख्या असंख्य दिग्गजांनी ज्या खुर्च्यांमधून बसून शाही भोजन घेतलेले आहे. त्या ठिकाणी राज्यपालांनी कर्मचारी महिलांसाठी शाही भोजणाचा कार्यक्रम साजरा केला.झाडलोट करणाऱ्या सफाईगार महिला, बगिचा सांभाळणाऱ्या महिला, धुणीभांडी करणाऱ्या महिला, अगदी शौचालय साफ करणाऱ्या महिलांनाही राज्यपालांनी शाही भोजनाच्या पंगतीत बसण्याचा मान दिला. त्यांना भेटवस्तू देवून त्यांचा आदर सुद्धा केला.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आतापर्यंत एकाही राज्यपालांनी सामान्य कर्मचाऱ्यांना इतका मोठा मान दिला नव्हता, अशी भावना सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केली.

राज्यपाल स्वतःच्या पगारातूनही लोकांना करतात मदत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना साधारण तीन लाख रूपये प्रतीमहा वेतन आहे. त्यापैकी कराची काही रक्कम कापून जाते. परंतु त्यांच्या हक्काच्या इतर रक्कमेतील काही हिस्सा ते गरजूंना देत असतात. कर्मचारी असो, अथवा अन्य कुणीही. जो अडचणीत आहे, अशा व्यक्तीला ते आपल्या पगारातील रक्कम नियमितपणे खर्च करतात, असे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी