28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
HomeराजकीयNCP : हरियाणामधील एकता शक्ती पार्टीचे अध्यक्ष वीरेंद्र वर्मांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

NCP : हरियाणामधील एकता शक्ती पार्टीचे अध्यक्ष वीरेंद्र वर्मांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

हर‍ियाणमधील एकता शक्ती पार्टीचे अध्यक्ष मराठा वीरेंद्र वर्मा आणि त्याचे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याचा आनंद होत आहे असे व्ट‍िट काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. वीरेंद्र वर्मा हे हरिणामधील करनाल जिल्हयातील आहेत.

हर‍ियाणमधील एकता शक्ती पार्टीचे अध्यक्ष मराठा वीरेंद्र वर्मा आणि त्याचे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याचा आनंद होत आहे असे व्ट‍िट काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. वीरेंद्र वर्मा हे हरिणामधील करनाल जिल्हयातील आहेत. हा प्रदेश शेतीने संपन्न असून, या ठिकाणी मोठया प्रमाणात धान्य पिकते. मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला हामी भाव मिळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी शेतकऱ्याला भाव मिळवून देईल असे आश्वासन यावेळी शरद पवार यांनी दिले. आम्ही हरियाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत असेही शरद पवार यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

NCP : ‘पन्नास खोके महागाई एकदम ओके’ घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाई विरोधात धुळयात आंदोलन

​​Raj Bhavan : राजभवनचा निळाशार समुद्र, अभिनेता जॉकी श्रॉफ सुद्धा भारावला

​​Raj Bhavan : राजभवनचा निळाशार समुद्र, अभिनेता जॉकी श्रॉफ सुद्धा भारावला

हरियाणामध्ये आजकाल अनेक शेतकरी परंपरागत शेतकरी सोडून अधुनिक शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे त्यांन तिनपट नफा कमावतात. कृषि कायद्या विरोधात या जिल्हयात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांना लाठी चार्ज केला होता. हरियाणा सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे हरियाणामध्ये शेतीचे उत्पन्न वाढले आहे. हरिणामध्ये गहू तसेच ऊस मोठया प्रमाणात प‍िकतो. तसेच इतर अनेक कडधान्यांचे पीक देखील घेतले जाते. हरियाणामध्ये हिरतक्रांती झाली आहे. तसेच धवल क्रांती देखील झाली आहे.

या राज्यात मोठया प्रमाणात दुधाचे उत्पन्न मिळते. हरिणामधील जमीन कसदार असून, शेतकरी अत्यंत मेहनत घेतात. त्यामुळे चांगले पीक येते. मात्र केंद्र सरकारच्या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीला न्याय मिळत नाही. त्यामुळे शेतकरी सरकारवर नाराज आहे. शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन यावेळी दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी