29 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रNCP : 'पन्नास खोके महागाई एकदम ओके' घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाई...

NCP : ‘पन्नास खोके महागाई एकदम ओके’ घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाई विरोधात धुळयात आंदोलन

महाविकास आघाडीतील पक्षांनी भाजपच्या 50 खोक्यांविरुद्ध महाराष्ट्रात रान उठवले आहे. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील आवाज उठवायला सुरूवात केली आहे. ’50 खोके महागाई एकदम ओके’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या वतीने महागाई विरोधात माजी आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी धुळे येथे आंदोलन केले. या आंदोलनाला काँग्रेसच्या नेत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. राज्य सरकारला महागाई विरोधात जाणीव करुन देण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तुंचे भाव देखील वाढले आहेत.

अनेक वस्तुंना जीएसटी लावल्याने त्याचा सर्वसामान्य लोकांना त्रास सहन करावा लागतो आहे. महागाई विरोधात धुळे शहरातील गांधी पुतळा परिसरात हे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी काँगेस (NCP) पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा बाजी केली. केंद्र सरकारने महागाई वाढवून सामान्य लोकांचे कंबरडे मोडले असल्याची टीका आमदार अनिल गोटें यावेळी म्हणाले. ‘जनता भरते जीएसटी, गद्दार जातात गुवाहाटी’, ‘मोदी तेरी राज में कटोरा आगया हात में’,’महागाईने दुखते डोके, गद्दारांना 50 खोके ….50 खोके!,’ आशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

हे सुद्धा वाचा

​​Raj Bhavan : राजभवनचा निळाशार समुद्र, अभिनेता जॉकी श्रॉफ सुद्धा भारावला

Mantralaya News : बाळासाहेब पाटलांच्या खासगी सचिवांना जायचंय अतुल सावेंकडे !

Trupti Sandbhor : नांदेड वाघाला मनपाच्या आयुक्तपदी तृप्ती सांडभोर यांची नवनियुक्ती

महाविकास आघाडी सरकारने नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये 50 खोक्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. तसेच शिवसेनेचे माजी आमदार आदित्य ठाकरे देखील आपल्या भाषणांमध्ये वारंवार 50 खोक्यांचा उल्लेख करतांना दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस देखील 50 खोक्यांच्या विरोधात आवाज उठवत आहे. 50 खोक्यांची चर्चा ही दिल्ली पासुन गल्लीपर्यंत सुरू आहे.

अरविंद केजरीवाल यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये भाजपच्या महाराष्ट्रातील 50 खोक्यांचा उल्लेख‍ केला होता. कारण आपच्या काही आमदारांना फोडण्यासाठी 20 खोक्यांची ऑफर भाजपने दिली होती. तसेच प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील 50 खोक्यांचा उल्लेख केला होता. गैर भाजप राज्यातील सरकार कोसळवण्यासाठी भाजप खोक्यांची खेळी खेळत असल्याचे संपूर्ण देशाला माहित झाले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी