28 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeराजकीयज. मो. अभ्यंकरांनी शिक्षकांसाठी काय केले, ऐका त्यांच्याच तोंडून | भाग २

ज. मो. अभ्यंकरांनी शिक्षकांसाठी काय केले, ऐका त्यांच्याच तोंडून | भाग २

'लय भारी'ने नुकतीच मुलाखत घेतली होती. सुभाष मोरे व कपिल पाटील यांच्यामार्फत ज. मो. अभ्यंकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.ज. मो. अभ्यंकर यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहेच त्याच बरोबर त्यांच्या कामगीरी बद्दल ही माहिती घेण्याचा प्रयत्न ह्या मुलाखतीत केला गेलेला आहे.

विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील निवडणूक रंगात येवू लागली आहे(J.M.Abhyankar’s Contribution For Teachers). शिवसेनेकडून ज. मो. अभ्यंकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. विद्यमान शिक्षक आमदार कपिल पाटील हे यावेळी निवडणूक लढविणार नाहीत. कपिल पाटील यांच्याऐवजी शिक्षक भारतीकडून सुभाष मोरे हे निवडणुकीच्या रिंगणार उतरले आहेत. सुभाष मोरे यांची ‘लय भारी’ने नुकतीच मुलाखत घेतली होती. सुभाष मोरे व कपिल पाटील यांच्यामार्फत ज. मो. अभ्यंकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ज. मो. अभ्यंकर हे यापूर्वी शालेय शिक्षण खात्यात उपसचिव या पदावर कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्या सहीने शिक्षणसेवक पदाचा शासकीय निर्णय जारी करण्यात आला होता. शिक्षकांचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण करणारा हा निर्णय आहे. हा निर्णय ज. मो. अभ्यंकरांच्या सहीने काढण्यात आला होता, असा आरोप सुभाष मोरे व कपिल पाटील यांनी केला होता. सुभाष मोरे व कपिल पाटील यांच्या या आरोपाला ज. मो. अभ्यंकर यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहेच त्याच बरोबर त्यांच्या कामगीरी बद्दल ही माहिती घेण्याचा प्रयत्न ह्या मुलाखतीत केला गेलेला आहे.शाळेत भयमुक्त वातावरण टिकवणे, शिक्षकांवर कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होणार नाही ह्याची दक्षता घेणे,त्याच बरोबर शिक्षकांचे वेतन वेळेवर व्हावी व त्यात कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाही ह्याची दक्षता सुद्धा ज. मो. अभ्यंकर यांनी वेळोवेळी घेतली आहे.त्याच बरोबर ज्या वेळेस वसती शाळा आणि शिक्षकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस वसंत दुर्गे शिक्षण मंत्री असताना अभ्यंकरांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सरांनी मोठा उपक्रम राबवला होता.अशाच विविध विषयांवर ज. मो. अभ्यंकर यांच्या सोबत सदर मुलाखतीमध्ये चर्चा केली गेली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी