33 C
Mumbai
Wednesday, May 17, 2023
घरराजकीयमुंबईची आर्थिक सत्ता उद्ध्वस्त करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न; जितेंद्र आव्हाड कडाडले

मुंबईची आर्थिक सत्ता उद्ध्वस्त करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न; जितेंद्र आव्हाड कडाडले

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक बडे प्रकल्प गुजरात आणि अन्य राज्यांमध्ये गेल्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारविरोधात रान उठवले होते. यानंतर आता आणखी एका मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. केंद्र सरकारने वस्त्रोद्योग आयुक्तांना तसे निर्देश दिले आहेत. हाच धागा पकडत मोदी सरकारकडून मुंबई आणि महाराष्ट्राचे जाणीवपूर्वक खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी सुरु केला आहे. (Mumbai Textile office case)

याबाबत राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, दुसरे महायुद्ध झाले तेव्हा हे कार्यालय झाले होते. जेव्हा या महानगराला मँचेस्टर ऑफ इंडिया असे म्हटले जात होते. तेव्हा वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय मुंबईत होते. मग हे कार्यालय कोणत्या हेतूने हलवले जात आहे. मुंबईची आर्थिक सत्ता उद्ध्वस्त करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे, असा संतप्त सवाल आव्हाड यांनी केला आहे.

पुढे ते म्हणतात, 1943 मध्ये उद्योग कार्यलयाची भारतात स्थापना झाली. त्या माध्यमातून 1900 कापड उद्योग भारतात आले. हे उद्योग आणल्यानंतर आज 2023 मध्ये कार्यालय मुंबईतून हटवले जात आहे. उद्या आपला आनंदाचा पाडवा आहे. आपला आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे आपल्यासाठी ही एक दुःखद बातमी आहे की, टेक्स्टाईल आयुक्त कार्यालय दिल्लीला जात आहे.

मुंबईचे नुकसान होणार नाही पण माझ्या घरातील एक गोष्ट आहे तुम्ही जी उचलून तुम्ही बाहेर काढत आहात. तुम्ही ती शांतता आणि माझ्या घराचा अभिमान नेत आहात याचा अर्थ तुम्ही माझ्या घराचे महत्व कमी करणार आहात. मेहुल चोक्सीची रेड कॉर्नर नोटीस रद्द केली गेली. हे केंद्र सरकारच्या इशार्‍यावरून होत आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका केव्हाही होऊ द्या, राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज आहे, आमचे मित्रपक्ष शिवसेना आणि काँग्रेसही निवडणूक लढवण्यास तयार असून महाविकास आघाडी ही निवडणूक जोमाने लढवेल, असा सज्जड इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा:

गोमाता अलिंगन दिनावर महुआ मोईत्रा, जितेंद्र आव्हाड यांची टीका

जितेंद्र आव्हाडांचा योगी आदित्यनाथांवर तीक्ष्ण वार

भाजप पदाधिकाऱ्याला तलवारीने मारहाण; आरोपींवर कडक कारवाईची आमदार प्रवीण दरेकरांची मागणी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी