28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडणविसांच्या लाडक्या योजनेला जयंत पाटलांनी ठरवले बोगस

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या योजनेला जयंत पाटलांनी ठरवले बोगस

टीम लय भारी

नांदेड :-  महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सध्या काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेसाठी मराठवाड्याचा दौरा करत आहेत. त्यांनी मराठावाड्याची पाहणी करताना त्यांच्या लक्षात आले की, जलयुक्त शिवार योजनेवर मोठ्याप्रमाणावर पैसा खर्च झाला परंतु त्यांचा रिझल्ट आला नाही. जयंत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांची लाडकी योजना बोगस ठरली आहे (Jayant Patil said that Devendra Fadnavis plan has turned out to be bogus).

जयलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा दर्जा तर एकदम तकलादू आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामाबाबत लोकं समाधानी नाहीत असा आरोप महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. देवेंद्र फडणवीस यांनी जयलयुक्त शिवार योजना सुरू केली होती त्या योजनेवरून जयंत पाटील यांनी फडणवीसावर घणाघात टीका केली (Jayant Patil harshly criticized Fadnavis).

Jayant Patil said that Devendra Fadnavis plan bogus
जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस

जयंत पाटलांनी धनंजय मुंडेंचे केले कौतुक

नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

जलयुक्त शिवार योजनेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता जलयुक्त शिवार योजनेच्या कामावर  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करावी अशी मागणी सव्वा वर्षापूर्वी करण्यात आली होती. त्याची चौकशी सुरू असावी असेही जयंत पाटील म्हणाले.

धनंजय मुंडेंच्या कामाचा झपाटा, मध्यरात्रीही जनतेचे सोडविले प्रश्न

“If BJP Fails …”: Devendra Fadnavis Threatens To Retire Over OBC Quota

Jayant Patil said that Devendra Fadnavis plan bogus
देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील

जलयुक्त शिवार योजनेत 72 टीएमसी पाणी अडवल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. परंतु 72 टीएमसी पाणी म्हणजे एका धरणाचे पाणी आहे. पण त्यांनी सांगितलेली परिस्थिती तशी नाही. जलयुक्त शिवार योजनेच्या कामाबाबत लोकं समाधानी नाहीत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले (Jayant Patil also clarified that people are not satisfied with the work of Jalayukta Shivar Yojana).

लोकशाहीला सुरुंग लावण्याचं काम सुरू झालं – जयंत पाटील

राजकारणात उद्या नरेंद्र मोदीसाहेब किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एखादा अधिकारी आरोप करु शकतो त्यामुळे हे राजकीयदृष्टया अत्यंत चुकीचे आहे. राजकारणातल्या लोकांना अशा पध्दतीने भीती दाखवायला लागले तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल अशी भीती जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली (Jayant Patil expressed his fear that democracy in the country will come to an end if people in politics start showing fear in such a manner).

आज नांदेड येथे पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता जयंत पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.

NIA ने मनसुख हिरेन यांच्या हत्येच्यादृष्टीने मेन टार्गेट ठेवले पाहिजे. परंतु त्याऐवजी अटक झालेल्या व्यक्तीकडून काही वदवून घेऊन त्यादृष्टीने सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांना त्रास देण्याचा हा नवा प्रकार देशात भाजपने सुरू केलेला दिसतो असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला (Jayant Patil also directly accused the BJP of intimidating people working in public life).

परमवीरसिंग यांना आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांनी आरोप केला आहे म्हणजे याअगोदर त्यात तुम्ही सहभागी होतात का? असा प्रश्न निर्माण होत आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

कुणीतरी ‘अ’ आणि ‘ब’ चं नाव घेत असेल आणि त्यावर कारवाई होत असेल तर ही अत्यंत चुकीची पध्दत आहे. असंच घाबरवण्याचं काम केंद्रसरकारच्या एजन्सी करत असतील तर लोकशाहीला सुरुंग लावण्याचं काम सुरू झालं आहे असं गंभीर विधानही जयंत पाटील यांनी यावेळी केले.

सत्ता दिल्याशिवाय महाराष्ट्रासाठी तुम्ही काहीच करणार नाही का?

सत्ता आल्याशिवाय मी काहीच करणार नाही महाराष्ट्रासाठी… मला सत्ता मिळाली की मी सर्वकाही करेन… सत्ता मिळेपर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काहीही करणार नाही ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची नाही अशा शब्दात जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला (Jayant Patil took good note of Devendra Fadnavis statement).

आम्हाला सत्ता द्या ओबीसी समाजाचे आरक्षण तीन महिन्यात देतो असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारल्यावर जयंत पाटील यांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला (When asked by reporters, Jayant Patil took the news of his statement seriously).

सत्ता दिल्याशिवाय महाराष्ट्रासाठी तुम्ही काहीच करणार नाही का? असा सवाल करतानाच सत्ता आली किंवा खुर्ची मिळाली तरच काम करणार नाहीतर नाही असा जो फडणवीस यांचा हट्ट आहे हे योग्य नाही. असे वक्तव्य महाराष्ट्रातील कुठल्याच नेत्यांनी केलेले नाही याची आठवण जयंत पाटील यांनी करुन दिली (Jayant Patil reminded that no other leader in Maharashtra has made such a statement).

भाजपला सत्तेत येण्याची गरज नाही कारण राज्यातील जनतेने त्यांना नकार दिला आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला. ओबीसी समाजाबद्दल भाजपला आज जो कळवळा निर्माण झाला आहे. मात्र यांच्यामुळे भुजबळसाहेबांना तुरुंगात खितपत पडून राहावे लागले. एकनाथ खडसेसारखे ओबीसी नेते पक्षातून बाहेर काढले गेले. एकंदरीत भाजपमध्ये ओबीसी नेता राहणार नाही असा प्रयत्न भाजपकडून झाला. ओबीसी समाजाची चळवळच संपवण्याचं काम करण्यात आले असा गंभीर आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.

भुजबळसाहेबांनी भाजपकडे सोल्युशन काढण्याची विनंती केली आहे. पण फडणवीस काय म्हणतात मला सत्ता द्या… तीन महिन्यात प्रश्न सोडवतो. म्हणजे सत्ता दिल्याशिवाय महाराष्ट्रासाठी तुम्ही काहीच करणार नाही का? असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे (Will you not do anything for Maharashtra without giving power? Jayant Patil has also asked such a question).

या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, डॉ. सुनिल कदम, अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख उपस्थित होते.

सीबीआय, ईडीनंतर आता रिझर्व्ह बॅंकेचा दबाव आणला जात आहे का?

गोरगरीब खेड्यातील सामान्य माणूस शहरातील माणसं व मध्यमवर्गीय एकत्र येऊन अतिशय चांगल्या पध्दतीने बॅंका चालवतात. त्या बॅंकांवर निर्बंध आणणे हे चुकीचे आहे. रिझर्व्ह बॅंकेचे हे धोरण निषेधार्ह असून केंद्रातील भाजप सरकार सहकार क्षेत्राला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला (Jayant Patil accused the BJP government at the Center of trying to end the co-operative sector).

सहकार क्षेत्रातील बॅंकांवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून होत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता जयंत पाटील यांनी या धोरणावर तीव्र आक्षेप नोंदवला. दरम्यान सीबीआय, ईडीनंतर आता रिझर्व्ह बॅंकेचा दबाव आणला जात आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘आता तुम्हीच समजून जा’ असा सूचक इशाराही केला (Is the RBI now under pressure after the CBI, ED? When asked this question by the journalists, he also hinted that ‘now you understand’).

खाजगी बॅंका सामान्य लोकांना दारात उभ्या करत नव्हत्या असे लक्षात आल्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बॅंकांचे राष्ट्रीयकरण केले. सहकार म्हणजे सामान्य लोकांनी एकत्र येऊन निर्माण केलेली शक्ती. त्या शक्तीतून अनेक संस्था उभ्या राहिल्या आहेत. परंतु भाजपला महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील सहकार मोडून काढायचा आहे. मोदीसाहेबाशिवाय कुणी काही काम केले नाही पाहिजे अशी भावना भाजपची आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

लोकप्रतिनिधींनी चुका केल्यानंतर रिझर्व्ह बॅंका किंवा नाबार्डकडे कंट्रोल असायला हवा अशी मागणी आहे. परंतु नाबार्डचा कंट्रोल जाऊन रिझर्व्ह बॅंकेने कंट्रोल घेतला आहे. आता रिझर्व्ह बॅंकेने सगळ्या संचालक मंडळावर आणखी एक सल्लागार मंडळ नेमावे असे आदेश दिल्याचे सांगतानाच एवढे नियंत्रण केल्यावर आपली इकॉनॉमी ग्रोथ कशी होणार आहे. इकॉनॉमी ग्रोथ करायची असेल तर लिबरल विचार हवेत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले (Jayant Patil also clarified that liberal thinking is needed if the economy is to grow).

प्रत्येक गोष्टीत सरकार जर लिबरल असेल तर इकॉनॉमी ग्रोथ फार वेगाने होते. सरकार जर रिस्टिक्टीव्ह अशा रेझीम्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नियम, कायदे करून अंकुश आणण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात काही करावं पण जोपर्यंत भ्रष्टाचार होत नाही तोपर्यंत त्या संस्थेला स्वतः ग्रो व्हायला परवानगी द्यावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी यावेळी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी