30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयजितेंद्र आव्हाड यांची नेमकी खंत काय?

जितेंद्र आव्हाड यांची नेमकी खंत काय?

टीम लय भारी
मुंबई: महाराष्ट्रातील भाजपने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर ओबीसी समाजाबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावर जोरदार निशाणा साधला. समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी बोलताना श्री. आव्हाड यांनी ओबीसी समाजाला आपले हक्क मिळवून देण्यासाठी पुरेसे प्रयत्न न केल्याबद्दल ताशेरे ओढले. “माझा ओबीसींवर फारसा विश्वास नाही.( Jitendra Awhad hat exactly is the grief )

ओबीसींना आरक्षण देणारा मंडल आयोग असूनही, समाजाचे नेते लढण्यासाठी मैदानात उतरले नाहीत कारण समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी लढायचे नाही असे दिसते. महार आणि इतर दलितांनीच लढा दिला,” श्री आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोदी – फडणविसांच्या विरोधातही आंदोलन करावे : प्रकाश शेंडगे

माझ्या घरावर मोर्चा येणार; मंत्री आव्हाडांनी ट्वीट करून दिली माहिती

जितेंद्र आव्हाड म्हणाले, वंचित समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी राजकीय आरक्षण दिले जाते. निर्यण प्रक्रियेतच त्यांना अधिकार नाही दिला तर तो पुन्हा वंचित राहतो. पूर्वीचा इतिहास तो कधीच पुसू शकत नाही. संपूर्ण युरोपमध्ये अफरमेटिव्ह अॅक्शनमध्ये रिझर्व्हेश आहे. तिथे एलजीबीटी, महिलांना, वर्णद्वेशींना रिझर्वेहशन आहे.

जगभरात रिझर्वेशन आहे. दुर्दैवाने याबद्दल आपण कधी बोललोच नाही म्हणून कळलंच नाही. ओबीसी हा गावकुसाबाहेबर गेलेला मोठा समूह आहे. गावागावात वेगवेगळ्या जाती समूहांचा संच आहे.११ लाख लोकप्रतिनिधींची ताकद रस्त्यावर उतरायला पाहिजे. पण तो एक येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

“कालीचरण बाबाला ताबडतोब अटक करा आणि ठेचून काढा,” जितेंद्र आव्हाड संतापले

Maharashtra Minister Jitendra Awhad’s remarks on OBCs sparks row

“देशभारत #OBC राजकीय आरक्षण रद्द झाले. 11 लाख लोक प्रतिनिधीनी आपली पद गमावली राजकीय आरक्षण गेल्या मुळे #OBC मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला जाईल . हीच 11लाखांची ताकद रस्त्यावर उतरली असती, तर नवीन इतिहास लिहला गेला असता. अजून वेळ गेलेली नाही, एकत्र येऊया,” असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी