28 C
Mumbai
Friday, March 1, 2024
Homeराजकीय'कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो'

‘कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो’

आयोध्येमध्ये सध्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेमुळे श्रीराम मंदिराचा (Lord Shree ram) मुद्दा सर्वाधिक गाजत आहे. मात्र या मुद्द्याला आता राजकीय रंग प्राप्त होऊ लागला आहे. शिर्डीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची सभा होती. या सभेमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीराम मांसाहारी (Shree ram non-vegetarian) असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांनी १४ वर्षे वनवास केल्याने ते शाकाहारी कसे असतील? असा सवाल केला. ते मांसाहारी असतील असं ते म्हणाले आहेत. मात्र कालपासून या वक्तव्याचे राज्यभरामध्ये पडसाद उमटत आहेत. यावर आता स्वत: जितेंद्र आव्हड यांनी पत्रकार परिषद घेत खेद व्यक्त केला आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना खेद व्यक्त केला आहे. ‘मला इतिहासाचं विकृतीकरण करायचं नाही. मला इतिहासाचा विपर्यास करायचा नाही. मी भावनेच्या ओघात बोललो आहे. ज्या श्रीरामाला आम्ही महाराष्ट्रामध्ये पांडुरंग म्हणतो. मी त्या रामाबद्दल मी म्हणालो की ते मांसाहारी होते, वाल्मिकी रामायणामध्ये सहा स्कंद आहेत. त्यातील अयोध्ये स्कंदेतील ५२ श्लोक १०२ जो आहे तो मी वाचून दाखवत नाही, कारण आता हा वाद मला अजून वाढवायचा नाही’.

हे ही वाचा

‘आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत’

‘शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा’

“मी मृत झालो होतो, मात्र…” हार्ट अटॅकमधून सावरत असलेल्या श्रेयस तळपदेने सांगितली ‘त्या’ दिवसाची आपबिती

‘तर मी खेद व्यक्त करतो’

‘कोणतंही वक्तव्य मी अभ्यासाशिवाय करत नाही. १ डिसेंबर २०२३ ला अन्न पुराणी नावाचा सिनेमा आला होता. त्यांनी वाल्मिकींनी लिहिलेला श्लोक म्हणून दाखवला आहे. मी कोणतंही वक्तव्य अभ्यासाशिवाय करत नाही. मात्र हल्ली अभ्यासापेक्षा भावनांना महत्त्व आहे. माझ्या कालच्या वक्तव्यावर मी खेद व्यक्त करतो’.

‘मी बाबासाहेब आंबेडकरांना माननारा कार्यकर्ता’

‘मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माननारा कार्यकर्ता आहे. फ्रिडम ऑफ स्पीच आहे. वाल्मिकींनी नाही लिहिलं तर गुन्हा कोणावर दाखल करणार आहात’? असा सवाल आता उपस्थित केला आहे.

‘मी गुन्ह्याला घाबरत नाही’

‘मी गुन्ह्याला घाबरत नाही. लॉजिकली बोलायचं असेल तर या पण लॉजिकच मान्य नसेल तर खेद व्यक्त करणार अजून काय करणार’ असं जितेंद्र आव्हड म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी