25 C
Mumbai
Sunday, March 3, 2024
Homeराजकीय'पोलिसवाले इतकं मारा की गाxxxची हड्डी तुटली पायजे, कुत्र्यासारखं मारा'

‘पोलिसवाले इतकं मारा की गाxxxची हड्डी तुटली पायजे, कुत्र्यासारखं मारा’

शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांचा बुधवारी वाढदिवस (Abdul sattar Birthday) होता. या वाढदिवशी त्यांनी विविध कर्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची नृत्यांगणा गौतमी पाटीलने (Gautami patil) सत्तारांच्या वाढदिवशी डान्स करत असताना तरूणांनी हुल्लडबाजी केली आहे. या कार्यक्रमामध्ये तब्बल १ हजार पोलिस असल्याचं स्वत: अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. तरूणांचा हुल्लडपणा थांबायचं नाव घेत नव्हता. यामुळे अब्दुल सत्तार भडकले आणि त्यांनी तरूणांना कुत्र्यासारखं मारा, गाxxxची हड्डी तुटली पाहिजे असा आदेश सत्तार यांनी पोलिसांना दिला. या प्रकरणावरून काही विरोधकांनी सत्तार यांचे कान टोचले आहेत.

नेमकं काय घडलं?

अब्दुल सत्तार यांचा काल वाढदिवस होता. वाढदिवशी गौतमी पाटील आपल्या नृत्याने अनेक तरूणांना प्रभावित करत होती. तरूणांनी गौतमीच्या नाचण्यावर हुल्लडबाजी केली, यावेळी अब्दुल सत्तार स्टेजवर आले आणि पोलिसांना हुल्लडबाजी करणाऱ्या तरूणांना मारण्याचे आदेश दिले. तरीही तरूण एकत नव्हते. त्यानंतर पोलिसांनी तरूणांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर सत्तार यांनी तरूणांना तुरूंगात टाकण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणावरून सत्तार हे संतापले असून त्यांनी तरूणांना ‘गाxxxची हड्डी तुटेपर्यंत मारा’ असा आदेश पोलिसांना केला.

हे ही वाचा

‘कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो’

‘आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत’

‘शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा’

‘कुत्र्यासारखं मारा’

‘गाxxxची हड्डी तुटेपर्यंत मारा, कुत्र्यासारखं मारा, १ हजार पोलिस असताल तर ५० हजार लोकांना मारायला काय लागतं, असा धक्कदायक वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे. तसेच गोंधळ घालणाऱ्या लोकांना जेलमध्ये टाकण्याचे आदेश पोलिसांना दिले’. या प्रकरणावर आता कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अब्दुल सत्तारावर टीकेचे अस्त्र सोडले आहेत.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

अब्दुल सत्तार यांनी केलेल्या पोलिसांच्या आदेशावर आता विजय वडेट्टीवार यांनी टीकेची तोफ डागली आहे. ‘महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा. मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो जे त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा स्वतः जनतेसमोर आणला. हजारोंच्या गर्दी सामोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात. महाराष्ट्र पोलीस दलातील जवानांना हे महायुतीतील मंत्री स्वतःच्या टोळीतील “गुंड” समजतात का ? सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रम घेऊन उपस्थितांच्या आई बापांवर अश्लील भाषेत टिप्पणी करत हजारो माता भगिनींना मान शरमेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि हे कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम’? , असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी