33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयकर्नाटकात सिद्धरमय्या सरकारचा शपथविधी : राहुल गांधी म्हणाले दोन तासांत आश्वासने पूर्ण...

कर्नाटकात सिद्धरमय्या सरकारचा शपथविधी : राहुल गांधी म्हणाले दोन तासांत आश्वासने पूर्ण करणार

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी शनिवारी सिद्धरमय्या यांनी तर उपमुख्यमंत्रीपदी डी.के. शिवकुमार यांनी शपथ घेतली. बंगळुरुतील श्री कांतीरवा स्टेडीयमवर हा सोहळा पार पडला. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी सिद्धरमय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यासह आठ मंत्र्यांना दुपारी 12.30 वाजता गोपनियतेची शपथ दिली. याच स्टेडियमवर सिद्धरमय्या यांनी 2013 साली मुख्यमंत्रीपदाची पहिल्यांदा शपथ घेतली होती. सिद्धरमय्या दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले आहेत.

शपथविधी सोहळ्यानंतर राहुल गांधी यांचे भाषण झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, आम्ही निवडणुकीत पाच आश्वासने दिली होती. त्यांनी त्या पाच आश्वासनांची आठवण करुन देत आम्ही खोटी आश्वासने देत नाही, जे बोलतो ते करतो असे सांगितले. राहुल गांधी म्हणाले, तास-दोनतासांत नव्या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक पार पडेल. त्या बैठकीमध्येच आम्ही दिलेल्या पाच ही आश्वासनांचे कायद्यात रुपांतर केले जाईल. शेतकरी, कामगार, छोटे दुकानदार, तरुणवर्ग यांचे रक्षण करणे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे आमचे धेय्य आहे. कर्नाटकच्या नागरिकांनी काँग्रेसला जी शक्ती दिली ती आम्ही कधीच विसरणार नाही. आम्ही अगदी मनापासून तुमच्यासाठी काम करु असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

PUBG लव्हर्ससाठी आनंदाची बातमी, भारतात लवकरच पुन्हा गेम सुरु होणार

मोठी बातमी ! 2 हजार रुपयांची नोट चलनातून बंद होणार

…त्यावेळी शाहरुख खान सोबत चॅटींग केले; समीर वानखेडेंची न्यायालयात माहिती; अटकेपासून तात्पूरता दिलासा

उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर माथा टेकवला

शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरमय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि मंत्री विधानभवनात पोहचले. विधानभवनात पोहचताच सिद्धरमय्या थेट आत गेले मात्र डी.के. शिवकुमार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर माथा टेकवला आणि त्यानंतर त्यांनी विधानभवनात प्रवेश केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी