28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeटेक्नॉलॉजीPUBG लव्हर्ससाठी आनंदाची बातमी, भारतात लवकरच पुन्हा गेम सुरु होणार

PUBG लव्हर्ससाठी आनंदाची बातमी, भारतात लवकरच पुन्हा गेम सुरु होणार

पबजी गेम भारतात लवकरच पून्हा सुरु होणार आहे. त्यामुळे पबजी गेम खेळणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. बॅटलग्राऊंड मोबाईल इंडीया (बीजीएमआय) ची भारतात पुन्हा घरवापसी झाली आहे. काही महिन्यांपूर्वी भारत सरकारने पबजी गेमवर बंदी घातली होती. बंदी नंतर पबजी गेम अॅप गुगल प्ले स्टोअर आणि एप स्टोअरवरुन हटविण्यात आले होते.

भारतात आता पुन्हा पबजी गेमची एन्ट्री होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पबजी पुन्हा सुरु होणार असल्याची चर्चा होती मात्र आता क्राफ्टने अधिकृतरित्या पबजीची भारतात पुन्हा एन्ट्री होणार असल्याचे सांगितले आहे.

आता प्लेस्टोअर वरुन काही दिवसांतच पबजी गेमचे अॅप डाऊनलोड करता येणार आहे. बीजीएमआय ही पबजी मोबाईल इंडीयाचाच रिब्रांड आहे. जो क्राफ्टनने काही बदल करुन पून्हा लॉन्च केला होता. क्राफ्टन इंडियाचे सीईओ शॉन ह्युनिल सोहन यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

ते म्हणाले, आम्हाला भारतात बीजीएमआय पुन्हा सुरु करण्यास मंजूरी दिल्याबद्दल आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत. पबजी अॅप लवकरच प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यानी दिली. गेल्या काही काळात भारत सरकारने जवळपास 300 हून अधिक अॅपवर बंदी घातली आहे, त्यापैकी बीजीएमआय हे एकमेव अॅप असे आहे जे पुन्हा उपलब्ध होणार आहे. साऊथ कोरियाची कंपनी क्राफ्टनने भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये 10 हजार डॉलरची गुंतवणूक देखील केली आहे.

हे सुद्धा वाचा

मोठी बातमी ! 2 हजार रुपयांची नोट चलनातून बंद होणार

…त्यावेळी शाहरुख खान सोबत चॅटींग केले; समीर वानखेडेंची न्यायालयात माहिती; अटकेपासून तात्पूरता दिलासा

गोरी नव्हते म्हणून रिजेक्ट केले; चिंत्रांगदा सिंहचा मोठा गौप्यस्फोट

भारत सरकारने बीजीएमआयला म्हटले आहे की, जर सर्व्हर लोकेशन आणि डेटा सुरक्षिततेला काही अडचणी येत नसतील तर ते तीन महिन्यांची ट्रायल घेऊ शकतात. तीन महिन्यांच्या या ट्रायलमध्ये सरकार अॅपच्या वापरकर्त्यांची सेफ्टी आणि अॅडिक्शनबाबत देखील लक्ष ठेवेल.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी