31 C
Mumbai
Wednesday, September 18, 2024
Homeराजकीयखळबळजनक : करूणा शर्माचा धनंजय मुंडेंवर दबाव पैसे उकळण्यासाठी, शर्मा यांच्या संवादातूनच...

खळबळजनक : करूणा शर्माचा धनंजय मुंडेंवर दबाव पैसे उकळण्यासाठी, शर्मा यांच्या संवादातूनच प्रकार आला पुढे

टीम लय भारी

परळी: – उच्च न्यायालयातील धनंजय मुंडे यांच्या वकील सुषमा सिंह यांच्या प्रसिध्दी बाबत करुणा शर्मा यांना घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या नोटीसीचा संदर्भ देत कथित करुणा शर्मा यांची त्यांच्या हितचिंतकाशी बोलणारी एक धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे (Karuna Sharma pressures Dhananjay Munde to make money).

या क्लिपमध्ये करुणा शर्मा या उच्च न्यायालयाचा अवमान होण्याबाबतची मिळालेली नोटीस सत्य आहे व आपल्याला जाणीव असून, हे आपल्या फायद्याचेच आहे.आपल्याला फक्त ‘रायता’ म्हणजेच गोंधळ पसरवायचा आहे आणि आपला मूळ उद्देश दबाव टाकून पैसे उकळण्याचा आहे असे बोलताना स्पष्ट ऐकायला येत आहे.

नेमकं काय आहे ऑडिओ क्लिप मध्ये?

या ऑडिओ क्लिपमध्ये करुणा शर्मा या आपल्या हितचिंतकाशी वार्तालाप करत असून, यामध्ये समोरील व्यक्ती त्यांना सांगतो की, “तुमने सामनेसे आई नोटीस और व्हायरल मेसेज देखा क्या? उसमे उनकी वकील सुषमा सिंह ने लंबा लिखा है की उसके बारे मे तुम कुछ भी पब्लिश करते हो…. (पुढील संवादात समोरील व्यक्तीने मराठी भाषेतील यासंबंधी काही प्रसार माध्यमात छापून आलेला मजकूर वाचून दाखवला आहे) पुढे तो म्हणतो की, “अगर कुछ बोलती हो तो वो कंटेम्ट ऑफ कोर्ट होगा”; त्यावर करुणा शर्मा म्हणतात, “कंटेम्ट होगा क्या?” “हां एक सो एक टक्का कंटेम्ट होगा, इसलीये तुम जो भी बोलोगी सोच समझकर बोलणा!” (In the audio clip, Karuna Sharma is talking to his well-wisher).

शरद पवारांसमोर धनंजय मुंडेंचे ‘आयएएस’स्टाईल प्रेझेंटेशन; उद्धव ठाकरे म्हणाले, तगडा मंत्री !

धनंजय मुंडे महिनाभरानंतर मंत्रालयात झाले रूजू

त्यानंतर करुणा शर्मा सांगतात की, “अरे इसे मेरी वॉल से डाल दो (माझ्या अकाउंट वरून हे आपल्या पद्धतीने पोस्ट करा!) ये अपने लिये फायदा हो गया? पुछो कैसे?” त्यावर समोरचा म्हणतो, “कैसे?” तर करुणा शर्मा म्हणतात, “अरे मै जाऊंगी, मै मंदिर जाऊंगी और फिर रायता फैला दुंगी! (गोंधळ घालून टाकीन)

धनंजय मुंडेंच्या जीविताला धोका, महिलेकडे आढळले बेकायदेशीर पिस्तूल

Woman who claims to be Dhananjay Munde’s second wife among two held for attack on man

पुढे करुणा शर्मा म्हणतात, “अरे अपनेको क्या बस पैसे निकालने है, प्रेशर बनाके। तू भी बोल देना मै पत्रकार हूँ!” त्यानंतर संभाषण बंद होते! या बाईंचा उद्देश केवळ ब्लॅकमेल करण्याचा आहे, हे धनंजय मुंडे सुरुवातीपासून सांगत आले आहेत. त्यांनी केलेल्या खुलाशात व कोर्टात केलेल्या याचिकेत देखील याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यानंतर आज समोर आलेल्या या क्लिप मध्ये करुणा शर्मा या केवळ पैसे उकळण्यासाठी हे सर्व स्टंट करत आहेत, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.

परळी पोलिसात गंभीर गुन्हे दाखल

दरम्यान उच्च न्यायालयाच्या अंतरिम निर्णयाचा सोशल मीडियावर अवमान करत बेछूट आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांनी परळीत येऊन पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती, मात्र वरील क्लिप मध्ये सांगितल्या प्रमाणे त्यांनी परळी शहरात येऊन केवळ ‘रायता फैलावण्याचा’ प्रयत्न केला आहे. वैद्यनाथ मंदिर परिसरात येऊन मुंडेंच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या महिलांची कॅमेऱ्या समोर थेट जात काढून शिवीगाळ करणाऱ्या करुणा शर्मा यांच्या विरुद्ध विशाखा घाडगे या महिलेच्या फिर्यादीवरून परळी पोलिसात ऍट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या करुणा या पोलीसांच्या ताब्यात असून त्यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. करुणा शर्मा यांचे ‘रायता अस्त्र’ आता बुमरँग झाले असल्याचे दिसून येत आहे.

करुणा शर्मा व त्यांच्या मोरे नामक साथीदारावर ऍट्रॉसिटी सह प्राणघातक हल्ला केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळल्याची देखील चर्चा आहे. या सर्व घडामोडी पाहता व्हायरल झालेल्या क्लिप नुसार हे सर्व स्टंट केवळ पैश्यासाठी ब्लॅकमेल करण्यासाठीच आहेत अशी चर्चा सोशल मीडियावर व्यक्त होत आहे, तर काहींनी करुणा शर्मा यांनी महिला असल्याचा फायदा घेत सोशल मीडियावर अनेकांची दिशाभूल करून सहानुभूती मिळवण्यासाठी मोठे चक्रव्यूह रचले आहे , परंतु या क्लिप मध्ये त्यांचा लालची हट्ट स्पष्ट होत असून त्यांची व त्यांच्या साथीदारांची कसून चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली आहे (Karuna Sharma and his accomplice More have been charged with aggravated assault with atrocity).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी