29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयकिरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणातील पिडीत महिलेने तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे; निलम...

किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणातील पिडीत महिलेने तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे; निलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ काल एका न्यूज चॅनलवर दाखविण्यात आला. त्यानंतर या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले. आज विधानपरिषदेत देखील या प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आवाज उठवत कारवाईची मागणी केली. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. या प्रकरणाच्या तपासात काय निष्पन्न होणार? जर ती पीडित महिला हे सगळं पाहत असेल तर त्यांनी सभागृहावर विश्वास ठेवायला हवा. तसेच वृत्तवाहिन्यांनी व्हिडिओ दाखवताना थोडी काळजी घ्यावी अशी विनंती डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ समोर आल्यानंतर आज  विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी  व्हिडीओचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी उपसभापती गोऱ्हे यांना या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह देखील दिला. हा मुद्दा मांडल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरावरून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणा केली.

या मुद्दयावर बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, हा मुद्दा खूपच अस्वस्थ करणारा आहे. चॅनेलवर घराघरामध्ये हे संपूर्ण शॉर्ट दाखवले जातात. घरातील मुलं-मुली आणि बाकीची कुटुंब असते. त्यांच्यासमोर हे असे शॉर्ट वारंवार दाखवले जातात. त्यामुळे मी विनंती करते की आपल्याकडे येणारे व्हिडिओ ब्लर करा. असले व्हिडिओ दाखवताना बंधन सर्व माध्यमांनी गंभीरतेने पाळावे.

हे सुद्धा वाचा 

किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणाचे विधानपरिषदेत पडसाद; अंबादास दानवेंकडून पेनड्राईव्ह सादर

मंत्री अभ्यास न करता सभागृहात कसे येतात, विरोधकांसह भाजपचे आशीष शेलार देखील संतप्त

नियतीचा खेळ! जीपला भरधाव कंटेनरची धडक, शाळकरी मुलांच्या मृत्यूनं काळीज पिळवटलं…

पोलिसांचा तपास होईल त्यावेळी मिळणारी माहिती देखील माध्यमांनी काही मर्यादा पाळावी. पेनड्राईव्ह मला मिळाला आहे. त्यावरती आवश्यक कार्यवाही केली जाईल. हा व्हिडिओ संबंधीत चौकशी अधिकारी यांचेकडे पाठवला जाईल. या मधील महिलेची तक्रार आवश्यक आहे, असे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी