28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयमाढा लोकसभा मतदारसंघावर जयंत पाटलांचा दावा; शरद पवारांसमोर मोठा पेच

माढा लोकसभा मतदारसंघावर जयंत पाटलांचा दावा; शरद पवारांसमोर मोठा पेच

राज्यात लोकसभा (lok sabha) निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची चढाओढ होतान दिसत आहे. तर बड्या नेत्यांसमोर मोठं पेच निर्माण होत आहेत. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी माढा लोकसभा (Madha lok sabha) मतदारसंघ रासपाला सोडणार असल्याची घोषणा केली होती. मात्र या मतदारसंघात आता मोठा पेच निर्माण होणार असल्याचे दिसत आहे. कारण या मतदार संघावर शेकापने दावा आहे. यासाठी शेकापचे नेते जयंत पाटील (Jayant patil ) यांनी पवारांची भेटदेखील घेतली. (shetkari kamgar party jayant patil meets sharad pawar Madha lok sabha)

सांगोला तालुक्यासह माढा तालुक्यात शेकापची मोठी ताकद आहे. त्यामुळे माढासह हातकणंगले हे दोन मतदारसंघ शेकापाला मिळावेत असा डाव भाई जयंत पाटील यांच्याकडून टाकला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे.

शरद पवार यांची भेट घेत शेकापचे नेते जयंत पाटील यांनी माढा मतदारसंघातून गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना खासदारकीची उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी केली आहे. पवारांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा SBI ला झापलं; लपवाछपवी नको, तीन दिवसांत सगळे तपशील द्या

शेकापचे जयंत पाटील काय म्हणाले?

माढा मतदारसंघात मी गेलो होतो तिथल्या जागेवर आमच्या शेकापनं दावा केला आहे. या ठिकाणी गणपतराव देशमुखांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांच्या उमेदवारीची मागणी आम्ही केली आहे.

काल मी माढ्यातील काही प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा केली, त्यानंतर महाविकास आघाडीसमोर आमची मागणी ठेवली आहे. पहिल्यापासून आमचा हा आग्रह आहे की जागेपेक्षा महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणं महत्वाचं आहे. यासाठी आमचं थोडंफार नुकसान झालं किंवा एखादी जागा मिळाली नाही तरी चालेल. पण महाविकास आघाडी एकत्र येऊन महाराष्ट्रात सध्या जे वातावरण तयार झालं आहे त्याला तडा जाऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे.

आई-वडिलांना कोण बाहेर काढतं का असं म्हणत अजित पवार यांची भावाने सोडली साथ

अनिकेत देशमुख हे डॉक्टर आहेत. त्यांची प्रतिमा चांगली आहे. विधानसभेला ते केवळ ४०० मतांनी पडले होते. त्यांच्यामागे गणपतराव देशमुखांचं नाव आहे. आमची जवळपास दीड लाख मतं माढा मतदारसंघात आहेत. पण यावर एकमत झालं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतो आहे.

जरी आमच्या बाजूनं निर्णय झाला नाहीतरी मी महाविकास आघाडीसोबत आणि इंडिया आघाडीसोबत राहणार आहोत. महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा महाराष्ट्रात आमचं नुकसान झालं. अशी खंत व्यक्त करत आमच्या उमेदवारांचा विश्वासघात केला गेला. ते लोक आता सोडून गेलेले आहेत त्यामुळं आमची मविआकडं तक्रार नाही. असही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

‘फडणवीसांचे ‘ते’ कर्तृत्व म्हणजे राजकीय परंपरेला काळिमा फासणारी बाब’

माढा लोकसभा मतदारसंघ अधिकच चर्चेत आला आहे. कारण आधी महायुती आणि आता महाविकास आघाडीत या जागेवरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षात माढा लोकसभा मतदारसंघासाठी पक्षांतर्गत स्पर्धा असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील या जागेवर दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत देखील आता याच मतदारसंघावरून रस्सीखेच सुरु झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी