30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयमहाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे २९ एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज

महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे २९ एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज

येत्या २९ एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याच्या नियोजनासाठी गुरुवारी शिवसेनेच्या शालिमार येथील कार्यालयात नियोजन बैठक झाली. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उत्तर महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त शक्तिप्रदर्शन असेल असा उमेदवारी अर्ज दाखल झाला पाहिजे असे सांगितले तर अनेकांनी वाजे यांच्या उमेदवारीबद्दल वेगवेगळे दावे केले.बैठकीस जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते,मुशिर सय्यद,सचिन मराठे, देवानंद बिरारी. विनायक पांडे,डी. जी सूर्यवंशी ,महेश ,संजय चव्हाण,उपजिल्हा प्रमुख निवूती जाधव आदिनी मार्गदर्शन केले.

येत्या २९ एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze)उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याच्या नियोजनासाठी गुरुवारी शिवसेनेच्या शालिमार येथील कार्यालयात नियोजन बैठक झाली. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उत्तर महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त शक्तिप्रदर्शन असेल असा उमेदवारी अर्ज दाखल झाला पाहिजे असे सांगितले तर अनेकांनी वाजे यांच्या उमेदवारीबद्दल वेगवेगळे दावे केले.बैठकीस जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते,मुशिर सय्यद,सचिन मराठे, देवानंद बिरारी. विनायक पांडे,डी. जी सूर्यवंशी ,महेश ,संजय चव्हाण,उपजिल्हा प्रमुख निवूती जाधव आदिनी मार्गदर्शन केले.(Maha Vikas Aghadi’s Rajabhau Waze to file nomination on April 29)

जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी हि स्वतः हुन पुढे येऊन काम करण्याची निवडणूक आहे. शिवसेना ठाकरे गटाने २१ उमेदवार दिले असून त्यापॆकी १८ ते १० उमेदवार निवडून येतील . समोरचा उमेदवार घराघरात पोहचला आहे त्यामुळे छगन भुजबळ यांनी उमेदवारी घेणें नाकारले आणि माघार घेतली. त्यांनतर तिकीटवाटपाचा घोळ अजूनही संपलेला नाही. सिन्नर तालुक्यात २३ गावात आमचे सर्व मतदान राजाभाऊ वाजे यांना आहे असे एकतर्फी ठराव झाले असल्याचे बडगुजर म्हणाले. माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी उमेदवार जाहीर होऊन २५ दिवस झाले आहेत. विरोधी पक्षाचा उमेदवार अजून जाहीर होत नाही कारण राजाभाऊ वाजे आता इतके पुढे गेले की लोक उमेदवारी घ्यायला घाबरत आहेत.
महाराष्ट्र मध्ये सर्वात आधी राजाभाऊ वाजे ४ लाख मतांनी निवडून येतील. ४० आमदार आणि १३ खासदार फुटले मात्र त्यापैकी ६ खासदारांना तिकिट नाही भेटले आणि ज्यांना भेटले त्यांचा सामना आपल्याला करायचा आहे असे गायकवाड म्हणाले.

डी.जी.सूर्यवंशी यांनी उमेदवार लवकर जाहीर झाला हे फायद्याचे ठरले त्यामुळे उमेदवाराला जनतेपर्यंत पोहचले
सहाही मतदार संघात सवांद मेळावा झाला असून शहरात सर्वांनी चांगले काम उभे केले आहे.
उत्तर महाराष्ट्र मध्ये राजाभाऊ वाजेंचा अर्ज भरण्यासाठी एक नंबरची गर्दी झाली पाहिजे. मतदार यादीवर काम करणे गरजेचे आपण गाफील राहता कामा नये . ज्या ज्या भागातून आपण प्रतिनिधित्व करतो तेथे बारकाईने नियोजन केले पाहिजे असे डी.जी.सूर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी
प्रचार नियोजनांबाबत आपले विचार व्यक्त केले.

साहेबांच्या अश्रूंचा बदला घेण्याची वेळ
महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी एक्झीट पोल मध्ये महाराष्ट्र मध्ये ६ व्या क्रमांकावर राजाभाऊ वाजे यांचे नाव आहे असा दावा केला.राजकारणाची उलथापालथ झाली.आपला विश्वासघात झाला आपण ज्या निवडणुकीची वाट बघत होतो ती हीच निवडणूक आहे.अनेक चक्कर मुंबईला मारून सुद्धा तुम्हाला तिकीट भेटले नाही त्यामुळे तुमची काय लायकी आहे हे कळते असा टोला त्यांनी हेमंत गोडसे यांना लगावला.आतापर्यंत आपण जे काही सहन केले ते बाहेर काढत ही निवडणूक जिंकणे फार महत्वाचे आहे असे सांगितले. ज्यांनी साहेबांच्या डोळ्यात अश्रू आणले त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे असे शिंदे म्हणाले.

हि निवडणूक सर्व निवडणुकांचा पाया
माजी आमदार वसंत गिते यांनी २९ तारखेला आपल्या विजयाचा अर्ज भरण्यासाठी जायचे आहे . ठाणे आणि नाशिक चे उमेदवार आधीच विजयी आले आहेत. राजाभाऊ वाजे याना शिवसेना पक्षप्रमुखानी बोलवून उमेदवारी दिली त्यामूले असा भाग्यवान माणूस शोधून सापडणार नाही.
हि निवडणूक केवळ पक्षाची कसोटी नाही तर महाराष्ट्रची कसोटी आहे. हि निवडणूक जनतेने हातात घेतली असून जनता आपल्यासोबत आहे आणि पुढील सर्व निवडणुकीचा पाया हि निवडणूक असल्याने हि निवडणूक आपण जिकंलो तर पुढील सर्व निवडणूक सुकर होतील असे गीते यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी