30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीयभाजपला धक्का,जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचा 20 जागांवर विजय

भाजपला धक्का,जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचा 20 जागांवर विजय

टीम लय भारी

जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या जळगाव जिल्हा बँकेच्या 10 जागांची मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीत सुरुवातीला काही धक्कादायक निकाल लागले आहेत. महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलचे  एकूण 20 उमेदवार विजयी झाले आहेत तर एका मतदार संघात अपक्ष उमेदवार भाजपा आमदार संजय सावकारे विजयी झाले आहेत(Mahavikas Aghadi wins 20 seats in Jalgaon District Bank)

तर, रावेरात धक्कादायक निकाल लागला असून महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलच्या जनाबाई गोंडु महाजन एक मतानं विजयी झाल्या आहेत. सहकार पॅनेलच्या जनाबाई गोंडु महाजन यांनी विरोधी उमेदवार अरुण पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता. तर, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे याचा देखील विजय झाला आहे.

पण 13ची घटना त्यापेक्षाही निंदनीय, फडणवीसांचं विधान बेजबाबदारपणाचं; यशोमती ठाकूरांचा पलटवार

नेट बँकिंग करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा फसवणूक होईल

जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीनं भाजपला धक्का दिला आहे.   21 जागांपैकी 11 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, 7 जागांवर शिवसेना, 2  जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झालाय.

रोहिणी खडसे विजयी

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अॅड. रोहिणी खडसेंचा विजय झाला आहे. ओबीसी महिला राखीव मतदारसंघातून रोहिणी खडसे यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. हा विजय म्हणजे गेल्या 6 वर्षांत केलेल्या कामाची पावती असल्याची प्रतिक्रिया रोहिणी खडसेंनी व्यक्त केली आहे. यापुढंही जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

अनपेक्षित अन् धक्कादायक! माघार घेतलेला उमेदवार बँकेच्या निवडणुकीत विजयी

जनाबाई महाजन यांचा धक्कादायक विजय

महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलच्या जनाबाई गोंडू महाजन यांनी विरोधी उमेदवार अरुण पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. या निवडणुकीत त्यांचा 1 मताने विजय झाला आहे. रावेर येथील एकूण 54 मतदानापैकी तीन मत बाद झाली असून त्यातील जनाबाई गोंडू महाजन यांना 26 तर अनिल पाटील यांना 25 मतं मिळाली आहेत.

राष्ट्रवादीचे सतीश पाटील विजयी

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी ओबीसी मतदारसंघातून विजय मिळवलाय. या निवडणुकीच्या निकालाने जिल्हा बँकेवर सहकार पॅनलचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. प्रतिस्पर्धी पॅनलचे डिपॉझिट जप्त झाल्याने त्यांच्या बाबतीत किती नैराश्य होते, याची प्रचिती येत असल्याची प्रतिक्रिया सतीश पाटील यांनी व्यक्त केली.

भाजपने आम्हाला छुपी मदत केल्याने आम्हाला विजय मिळवता आल्याचा तिरकस बाण सोडत त्यांनी भाजपला चिमटा घेतला आहे. गुलाबराव देवकर यांनी इतर संस्था मतदारसंघातून तर डॉ. सतीश पाटलांनी ओबीसी मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

भुसावळ येथील भाजपा आमदार व भुसावळ विकास सोसायटी चे उमेदवार संजय सावकारे यांचा विजय तर महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलचे उमेदवार शांताराम धनगर यांचा पराभव झाला आहे. चोपडा येथे महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलचे घनःश्याम अग्रवाल विजयी झाले आहेत. यावलमध्ये महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलचे विनोद पाटील झाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी