33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयगोमाता अलिंगन दिनावर महुआ मोईत्रा, जितेंद्र आव्हाड यांची टीका

गोमाता अलिंगन दिनावर महुआ मोईत्रा, जितेंद्र आव्हाड यांची टीका

केंद्र सरकारने १४ फेब्रुवारी रोजी गोमाता अलिंगन दिन (Cow Hug Day) साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी त्यावर उपरोधिक टीका करत आता सरकारने आमच्या व्हेलेंटाईन डे साठी खास योजना आखल्याचे त्यांनी ट्विट करुन म्हटले आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील ट्विट करुन १४ फेब्रुवारी जगभरात व्हेलेंटाईन डे साजरा होतो आणि भारतात गाईला मिठी मारा असा साजरा केरण्याचे आदेश निघाले, म्हणत टीका केली आहे. (Mahua Moitra and Jitendra Awhad Criticism on Cow Hug Day)

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने गो प्रेमींनी १४ फेब्रुवारी हा दिवस गोमाता अलिंगन दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गाय हा भारतीय संस्कृतीची ओळख आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तीला कामधेनू किंवा गोमाता म्हणून देखील ओळखले जाते. मात्र पाश्चात्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामूळे वैदिक परंपरा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली संस्कृती, वारसा आपण विसरत चाललो आहोत. पण गायीची उपयुक्तता पाहता, गायीला अलिंगन दिल्यास आपल्यात आनंदाची भावना वाढते. त्यामुळे गायीचे महत्त्व लक्षात घेऊन गो प्रेमींनी १४ फेब्रुवारी हा दिवस गोमाता अलिंगन दिवस म्हणून साजरा करावा असे आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा

लहानपणीच आई सोडून गेली, वडिलांची हलाखीची परिस्थिती, मंत्री गिरीष महाजन धावले मदतीला; दिव्यांग गणेशला मिळणार दोन्ही हात

युपीए सरकारचा काळ देशाच्या इतिहासातील ‘द लॉस्ट डेकेड’; नरेंद्र मोदींचा विरोधकांवर प्रहार

तुमचे लव्ह मॅरेज झाले, बेरोजगारीमुळे माझे लग्न अडले; स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलीचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र!

१४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात व्हेलेंटाईन डे अर्थात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र त्याच दिवशी गोमाता अलिंगन दिवस साजरा करण्याच्या सरकारने काढलेल्या पत्रकामुळे खासदार महुआ मोईत्रा यांनी सरकारवर ट्विट करुन निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. 14 फेब्रुवारी जगभरात व्हॅलेंटाईन्स डे म्हणून साजरा केला जातो. आणि भरतात 14 फेब्रुवारी आता गाईला मिठी मारा असा साजरा केरण्याचे आदेश निघाले, अशी टीका आव्हाड यांनी ट्विट करुन केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी