28 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeआरोग्यलहानपणीच आई सोडून गेली, वडिलांची हलाखीची परिस्थिती, मंत्री गिरीष महाजन धावले मदतीला;...

लहानपणीच आई सोडून गेली, वडिलांची हलाखीची परिस्थिती, मंत्री गिरीष महाजन धावले मदतीला; दिव्यांग गणेशला मिळणार दोन्ही हात

शहादा (Shahada) तालुक्यातील असलोद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकणारा आठ वर्षीय दिव्यांग (disabled) गणेश माळी दोन्ही हात नसतानां सुध्दा आपल्या पायाने शाळेत अक्षरे गिरवतो, आपली स्वत: ची सर्व कामे स्वत: करतो. गणेशचे वडील अनिल माळी हे घरची परिस्थिती हालाखीची असल्याने दररोज रोजंदारीवर दुसऱ्याच्या शेतावर कामाला जातात तर आई लहान असताना सोडून गेली आहे. आशा परिस्थिती शाळेत हुशार असलेल्या गणेश ला वैद्यकीय मदतीची गरज होती. ती आता वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या प्रयत्नामुळे पुर्ण होणार असून गणेशला दोन्ही हात मिळणार आहेत. (Girish Mahajan initiative disabled Ganesh Mali will get both hands)

गणेश माळी याला आज मंत्री गिरीश महाजन यांच्या वैद्यकीय मदतीने ग्रामीण भागातील एका गरीब कुटुंबातील मुलाला हक्काचे दोनही हात मिळणार आहेत. एक दिवस एका कार्यकर्त्याने दिव्यांग गणेश माळी यांच्या विषयी मोबाईल फोनवर मंत्री गिरीश महाजन यांना मेसेज करून माहिती दिली. त्यांनी त्यांची तात्काळ दखल घेत या बालकाला आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावून घेतले.

हे सुद्धा वाचा

युपीए सरकारचा काळ देशाच्या इतिहासातील ‘द लॉस्ट डेकेड’; नरेंद्र मोदींचा विरोधकांवर प्रहार

तुमचे लव्ह मॅरेज झाले, बेरोजगारीमुळे माझे लग्न अडले; स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलीचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र!

निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर!

मंत्री महाजन यांनी गणेशच्या वडिलांकडे आस्थेने चौकशी केली. लवकरच गणेश माळी या बालकांवर मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटल (Global Hospital Mumbai) मधील प्रमुख डॉक्टरांशी दुरध्वनी व्दारे चर्चा करून उपचारासाठी लगेचच मदत करण्याचे आदेश मंत्रीमहोदयांनी यावेळी दिले. त्यांनी या बालकाच्या बाबतीत आपण सर्वतोपरी मदत करणार आहोत असे आश्वासन यावेळी गणेशचे पालक अनिल माळी यांना दिले. तसेच वैयक्तिक लक्ष देणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी