28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीय'मीरा रोडवर फिरवलेला बुलडोजर म्हणजे राजकारण'

‘मीरा रोडवर फिरवलेला बुलडोजर म्हणजे राजकारण’

देशामध्ये २२ जानेवारी दिवशी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पार पडली यासाठी देशातूनच नाहीतर जगभरातून असंख्य लोकांनी आपला सहभाग दाखवला. यावेळी हा दिवस अनेक लोकांसाठी फार महत्त्वाचा होता. देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण होतं. यावेळी २२ जानेवारीच्या रात्री काही हिंदु लोकं आपल्या वाहनांना झेंडा लावत जय श्रीरामचा नारा लावत होते. यावेळी मीरा रोडच्या नया नगरमध्ये काही मुस्लिमांनी त्यांच्यावर दगडफेक केल्यानं वातावरण चिघळलं. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी १३ जणांना अटक केलं असून जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जाईल त्याला महाराष्ट्रामध्ये खपवून घेतलं जाणार नाही. अशी प्रतिक्रिया दिली, यावेळी दुसऱ्या दिवशी महापालिकेनं जेसीबी आणि बुलडोजरचा वापर करत मीरा रोडमधील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

मीरा रोडच्या झालेल्या दोन गटातील राड्यामध्ये नयानगर येथे मोठे तणावपूर्वक वातावरण झालं आहे. त्यानंतर भाजपच्या आदेशावर याभागाध्ये बुलडोजर चढवण्यात आला. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र सरकारने मीरा रोडवर बुलडोजर चालवला याला राजकारण म्हणता येईल. दडपशाही वाचवण्यासाठी आणि अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण काय ठेवण्यासाठी हे केलं आहे’, असा दावा त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

काय होतं प्रकरण?

२२ जानेवारी दिवशी रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. यादिवशी रात्री मीरा रोड येथे समाजकंटकांनी हिंदु धर्मातील रॅली काढणाऱ्या लोकांवर दगडफेक केली. यावेळी अल्लाह हु अकबरचा नारा दिला. यावेळी त्यांनी हिंदुधर्मातील लोकांना मारहाण केली. यावेळी दुसऱ्या दिवशी त्याच भागामधील अनाधिकृत बांधकाम पाडण्याचं काम भाजपने केलं. मात्र हे एक राजकारण आहे. अल्पसंख्यांक नागरिकांच्या मनामध्ये भय पसरवयाचं काम याठिकाणी केलं जात असल्याचं म्हटलं जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी